1. बातम्या

पीएम केअर्स निधीला सढळ हाताने देणगी देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली: कोविड-19 महामारीने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. भारतातही कोरोना विषाणूचा प्रसार चिंताजनक असून आपल्या देशासमोर आरोग्य आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
 कोविड-19 महामारीने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. भारतातही कोरोना विषाणूचा प्रसार चिंताजनक असून आपल्या देशासमोर आरोग्य आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.

संकटाच्या परिस्थितीत, मग ते नैसर्गिक असो वा अन्य दुसरेपायाभूत सुविधा आणि क्षमताना होणारे नुकसान कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित आणि सामूहिक कारवाईची गरज असते. म्हणूनचपायाभूत सुविधा आणि संस्थात्मक क्षमता पुनर्रचना/संवर्धनासह आपत्कालीन स्थितीत जलद प्रतिसाद देणारी क्षमता निर्माण करणे आणि समाजाला त्वरित सावरण्याची तयारी ताबडतोब करावी लागते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रगत संशोधनाचे निष्कर्ष देखील अशा एकत्रित कृतीचा अविभाज्य घटक बनतात.

कोविड-19 महामारी सारख्या कसोटीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याच्या प्रमुख उद्दिष्टासह समर्पित राष्ट्रीय निधी असावा ही गरज लक्षात घेऊन तसेच पीडितांना मदत पुरवण्यासाठी 'आपत्कालीन परिस्थिती निधीसाठी पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत' (पीएम केअर्स फंड) या शीर्षकाअंतर्गत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि संरक्षणमंत्रीगृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत.

लोकसहभाग हा कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच विश्वास दाखवला असून हे त्याचेच आणखी एक उदाहरण आहे. या निधीमध्ये अगदी छोट्या रकमेची देणगी देखील देता येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक अगदी छोट्या प्रमाणात का होईना आपले योगदान देऊ शकतील. 

नागरिक आणि संघटना pmindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पंतप्रधान केअर्स निधीमध्ये पुढील माहिती भरून देणगी देऊ शकतात.

Name of the Account: PM CARES       
Account Number: 2121PM20202                                                                               
IFSC Code: SBIN0000691                                                                       
SWIFT Code: SBININBB104                                                                        
Name of Bank & Branch: State Bank of India, New Delhi Main Branch                                       
UPI ID: pmcares@sbi

pmindia.gov.in संकेतस्थळावर देणगी भरण्याचे पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

  • डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड
  • इंटरनेट बँकिंग
  • यूपीआय (भीम, फोनपे, अमेझॉन पे, गूगल पे, पेटीएम, मोबिक्विक इ.)
  • आरटीजीएस/एनईएफटी

कलम 80 (जी) अंतर्गत निधीमध्ये  दिलेल्या देणग्यांना प्राप्तिकरातून सूट देण्यात येईल.

English Summary: Appeal to generously donate to prime ministers citizen assistance and relief in emergency situations fund Published on: 03 April 2020, 10:38 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters