गेल्या 2 वर्ष्यापासून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. आधी कोरोना आणि नंतर अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु सध्या च्या काळात उत्पन्न कमी मिळत असले तरी पिकांना योग्य भाव मिळत असल्यामुळे बळीराजा समाधानी आहे. आता सर्वच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. यामध्ये कांदा, मिरची यांचा सुद्धा समावेश आहे.
धर्माबाद च्या मिरचीचे वेगळेपण:-
धर्माबादच्या मिरचीचा उपयोग खास करून तिखट बनवण्यासाठी केला जातो. आणि बाजारात लाल तिखटाचं भाव सुद्धा वाढले असल्यामुळे धर्माबाद बाजारात सुदधा लाल मिरचीचे भाव कडाडले आहेत. तसेच धर्माबाद आसपास च्या परिसरात लाल तिखट आणि लाल पावडर निर्मिती उद्योग सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे मिरची लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.मागच्या वर्षी लाल मिरचीचा भाव हा 150 रुपये किलो एवढा होता परंतु या वर्षी त्याच मिरचीला 200 ते 250 रुपये किलो एवढा भाव मिळत आहे. तसेच आता परराज्यात सुद्धा मिरचीची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
धर्माबाद ही बाजारपेठ खास करून लाल मिरची साठी अत्यंत प्रसिद्ध आहे. परंतु काही वर्षांपासून लाल मिरची ची आवक ही कमी झाली होती. परंतु या वर्षी पासून धर्माबाद सह आसपास च्या परिसरातील शेतकरी वर्गाने पीक पद्धती मध्ये बदल करून मिरचीचे उत्पन्न वाढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्माबाद बाजारपेठेत दिवसाला 150 ते 200 क्विंटल लाल मिरचीची आवक यायची परंतु आता लाल मिरची ला 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे भाव मिळत आहे.
तेलंगणातूनही आवक वाढली:-
धर्माबादची बाजारपेठ ही तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी सोईची आहे. कारण ही बाजारपेठ तेलंगणा राज्याला जवळ सुद्धा आहे. शिवाय जर अधिक भाव आणि आवक वाढली तरी दारावर परिणाम होत नाही हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे त्यामुळे तेलंगणा राज्यातील शेतकरी सुद्धा धर्माबाद बाजारपेठेकडे धाव घेत असतात. सध्या च्या वर्षी लाला मिरचीला धर्माबाद बाजारपेठत 7 हजारापसून ते 22 हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा होत आहे.
प्रक्रिया उद्योगालाही चालना:-
धर्माबाद बाजारपेठ येथील लाल मिरची तिखट बनवण्यासाठी केली जाते शिवाय तिखट असल्यामुळे अनेक परराज्यातून या मिरचीला मोठी मागणी आहे त्याचबरोबर आसपासच्या भागात लाल पावडर आणि मिरची पावडर बनवण्याचे लघु उद्योग सुद्धा वाढले आहेत. लाल पावडर बनवण्यासाठी या मिरचीला बाहेरून सुद्धा मागणी आहे यामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यांचा समावेश सुद्धा आहे. यामध्ये निझामबाद, हैदराबाद, कामारेडी, म्हैसा, बोधन, साठापूर या राज्यातून व्यापारी वर्ग मिरची खरेदी साठी धर्माबाद येथे येतात.
Share your comments