Nagar News :
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पावसाअभावी पिकांचे मोठं नुकसान होतं आहे. पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने जिल्ह्याच्या काही भागातील नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. तर जलसाठ्यांमध्येही देखील तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला समोर जावं लागणार आहे.
दरवर्षी पारनेर तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसंच जूनच्या सुरुवातीपासून पाऊस पडला नाही. सध्या खरीप पिकांची लागवड केली आहे. पण पावसाअभावी पिकांची वाताहत होऊ लागली आहे. तसंच पाण्याची टंचाई या वर्षीच झाली नाही तर दरवर्षी भेडसावत आहे्, अशी माहिती शेतकऱ्याने दिली आहे.
2018 मध्येही पावसाअभावी अशीच समस्या निर्माण झाली होती. त्या वेळी सरकारने आम्हाला लहान केटीविहीर दिले होते. ज्याची क्षमता खूप कमी आहे आणि बांधकामाचा दर्जाही कमी आहे. त्यामुळे पाणी जास्त काळ टिकू शकत नाही, त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही.
जानेवारीपासून पाण्याचे साठे कोरडे पडतात तसेच भूजल पातळी खाली जाते. आम्ही धरण बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी जलसंपदा विभागासारख्या विविध सरकारी संस्थांशी संपर्क साधला आहे. पण त्याबाबत काही कार्यवाही झाली नाही.
तसंच आम्ही गोदावरी खोऱ्यात येत आहोत. त्यामुळे ज्यांना 2019 मध्ये वरच्या गोदावरी प्रदेशात धरण बांधू नये असा न्यायालयाचा आदेश आहे. तसेच त्या आदेशानुसार पश्चिम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाइपलाइनद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवावे, असे नमूद केले. परंतु विभाग आणि शासनाच्या निष्क्रीयतेमुळे आम्हाला काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे आम्ही त्रस्त आहोत. तसंच धरणाची सोय झाली तर वारणवाडी, कामटवाडी, खडकवाडी, पोखरी, मांडवे, देसवडे या गावांना त्याचा फायदा होईल.
Share your comments