यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. आता शेतकरी मोठ्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.परंतु या रब्बी हंगामाच्या तोंडावर चिंता उत्पन्न करणारी बातमी आहे.
भारतामध्ये डाय अमोनिअम फॉस्फेट म्हणजेच डीएपी आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पि या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जर या खतांचा मागच्या वर्षीच्या साठ्याचा विचार केला तर त्या तुलनेने यावर्षी केवळ एक तृतीयांश साठा उपलब्ध आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवी यांनी शेतकऱ्यांना खतांचा साठा न करण्याचे आवाहन केलय. जर खत विभागाची आकडेवारी बघितली तर सध्या देशात 31 ऑक्टोबरपर्यंत डीएपी चा साठा 14.63 लाख टन इतका आहे.
हाचसाठा मागच्या वर्षी 44.95लाख टन होता. जर आपण मुरेटऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पी चा विचार केला तर ऑक्टोबर अखेर हा साठा 7.82 लाख टन इतका झालाय. मागच्या वर्षी हा साठा 21.70लाख टन इतका होता.
परंतु जमेची बाजू म्हणजे डीएपी आणि एम ओ पी खताचा विचार बाजूला ठेवला तर बाकीचे खते जसे की युरिया, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर सर्व खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
जरी युरियाचा विचार केला तर मागच्या वर्षी 79.76लाख टन इतका साठा होता. तसेच इतर एन पी के एस खतांचा साठा 38.40 लाख टन इतका असून मागच्या वर्षी हा साठा 38.40इतकाच होता.(स्त्रोत-लोकसत्ता)
Share your comments