आधार कार्डविषयी मिळेल सर्व प्रश्नांची उत्तरे ; UIDAI ने सुरू केली नवी सुविधा

20 March 2021 04:59 PM By: भरत भास्कर जाधव

देशातील नागरिकांच्या ओळखपत्र म्हणून आधार कार्डकडे पाहिले जाते. हे आधारकार्ड सर्व प्रकारच्या शासकीय कामांसाठी आवश्यक झाले आहे. पंरतु बऱ्याचवेळा आपल्याला आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागते. अशात युआयडीएआय म्हणजेच यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने लोकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे.

या सुविधेमुळे कोणतेही बदल अगदी सोप्या पद्धतीने करता येतील. हे बदल आपण घरी बसूनही सहज करू शकणार आहोत..

चार राज्यात आधार कार्डचं फेसबुक पेज झाले सुरू

आधार कार्ड धारकांना सुविधा मिळावी यासाठी युआयडीएआयने चार राज्यांमध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये फेसबुक पेजची सुरुवात केली आहे. या पेजवरुन आधार कार्डविषयीचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ शकतो. ही उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला मेसेज पाठवावा लागेल. दरम्यान फेसबुक पेजचं  प्रादेशिक ऑफिस दिल्लीमध्ये असणार आहे. या बाबत युआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती दिली आहे.

 

दरम्यान युआयडीएआयच्या फेसबुक पेजवर जाण्यासाठी आपल्याला https://facebook.com/Aadhaar-RO-Delhi-103164305146104 वर क्लिक करावे लागेल.  जर आपल्याला आधार कार्डसंबंधित काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आपल्याला या फेसबुक पेजवर मिळतील.  दरम्यान फेसबुक पेज आधी चंदीगड, पंजाब, जम्मू-काश्मीर, हरियाणा, लद्दाख आणि हिमाचल प्रदेशात सुरू झालेले आहे.

UIDAI aadhar card आधार कार्ड यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया
English Summary: Answers to all questions about Aadhar Card; New feature launched by UIDAI

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.