MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्कार

नवी दिल्ली: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्कार जाहिर झाला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्कार जाहिर झाला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी देशभरातील एकूण 44 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवन येथे होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान होणार आहे.

मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 15 हजारपेक्षा अधिक सैनिक प्रशिक्षित केले. शिवाय त्यांनी स्वत: चे शूटींगचे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे हे तंत्र भारतीय सेनेनही स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यागंना सीमा मेहता यांना कथक नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त उद्योजिका कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात येणार आहे.

मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समूह सुरू केला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना, त्यांच्या कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी 'नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सातारा जिल्यातील माण देशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांना ग्रामीण क्षेत्रातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योगदानाबद्दल 'नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

English Summary: Announcing Nari Shakti Award for 6 women in Maharashtra Published on: 07 March 2019, 08:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters