केंद्रीय कृषी मंत्रालयाचा 2018-19 खरीप हंगाम पिक उत्पादन अंदाज

Friday, 28 September 2018 08:23 AM


नवी दिल्ली:
केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष 2018-19 च्या खरीप हंगामाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. विविध राज्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. हा प्राथमिक अंदाज आहे.

या अंदाजानुसार, खरीप हंगामात महत्वाच्या पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे असेल.

एकूण अन्नधान्य : 141.59 दशलक्ष टन

तांदूळ -99.24 दशलक्ष टन

पोषक कडधान्ये - 33.13 दशलक्ष टन

मका- 21.47 दशलक्ष टन

डाळी-9.22 दशलक्ष टन

तूर- 4.08 दशलक्ष टन

उडीद-2.65 दशलक्ष टन

तेलबिया - 22.19 दशलक्ष टन

सोयाबीन-13.46 दशलक्ष टन

शेंगदाणे- 6.33 दशलक्ष टन

करडई तेलबिया- 1.52 दशलक्ष टन

कापूस- 32.48 दशलक्ष गासड्या

ताग आणि मेस्ता - 10.17 दशलक्ष गासड्या

ऊस- 383.89 दशलक्ष टन

यंदाच्या हंगामात  1जून 12 सप्टेंबर या कालावधीत एकूण मोसमी पाऊस सरासरीपेक्षा 8 टक्के एवढा झाला. वायव्य,मध्य आणि दक्षिण भारतात सरासरी पाऊस सामान्य होता . म्हणजेच, धान्य उत्पादक क्षेत्रात पाऊस सामान्य होता. पहिल्या अंदाजानुसार, या खरीप हंगामात एकूण अन्नधान्य उत्पादन 141.19 दशलक्ष टन एवढे होईल. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 0.86 दशलक्ष टन अधिक आहे. भात पिक, डाळी, तेलबिया आणि ऊसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. तर, पोषक कडधान्ये आणि काही डाळींच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

kharif खरीप पिके crops production उत्पन्न government of india भारत सरकार कृषी agriculture estimates अंदाज Season हंगाम

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.