मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहरभाई पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोधी निवड करण्यात आली आहे. लोकसभेला सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्याचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी राज्यातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्याची आता बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
देशात नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. त्याच्या शपथविधीला जवळपास ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण भाजपचे सहकारी अजित पवार यांच्या पक्षाला केंद्रात कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांचा नव्या एनडीए सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून समावेश करण्याचा भाजपचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळला होता. यामुळे आता सुनेत्रा पवार केंद्रात मंत्री होणार का याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भावजय सुनेत्रा पवार विरोधात उभ्या होत्या. यामुळे येथील निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच मानली जात होती. पण बारामतीत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीये. तर सुनेत्रा पवार याचा सुळे यांनी तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी पराभव केला. पण पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. या पदासाठी राष्ट्रवादीतले अनेक जण इच्छूक असल्याचं देखील बोललं जात होतं. पण सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम लागला.
Share your comments