1. बातम्या

दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 पुरस्कारांची घोषणा

मुंबई: बाराव्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 च्या पुरस्कारांची घोषणा राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ञ, संस्था यांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो. येत्या दि. 3 जुलै रोजी, सायंकाळी 6 वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
बाराव्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 च्या पुरस्कारांची घोषणा राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ञ, संस्था यांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो. येत्या दि. 3 जुलै रोजी, सायंकाळी 6 वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, दूरदर्शनचे अपर महासंचालक एम. एस. थॉमस, उपसंचालक नंदन पवार, सहायक संचालक जयू भाटकर, जावेद शेख यावेळी उपस्थित होते. 

सह्याद्री कृषी सन्मान 2019 पुरस्काराचे विजेते पुढीलप्रमाणे:

  • जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Water Management): 
    श्री. हणमंतराव जनार्दन मोहिते (मु.पो. यशराज शेती फार्म, मोहित्यांचे वडगाव, ता. कडेगाव, जि. सांगली)

  • कृषी क्षेत्रातील संशोधन किंवा अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कार्य (Excellent Research or Innovative Work in Agriculture): 
    डॉ. पी. जी. पाटील, डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. व्ही. जी. अरुडे, डॉ. व्ही. मगेश्वरन, डॉ. सुंदरमूर्थी, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. ए. के. भारीमल्ला (केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, सिरकॉट, भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबई)

  • ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Rural-Agricultural Processing Field): 
    परांजपे एग्रो प्रोडक्टस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (जी-१/१ मिरजोळे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्र, जि. रत्नागिरी)

  • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Animal Husbandry & Dairy Development): 
    श्री. पवन ताराचंद कटनकार (मु. सिंदपुरी, पो. सिहोरा, ता. तुमसर, जि. भंडारा)

  • मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in fisheries Development): 
    वच्छलाबाई महादेवराव गर्जे (मु.पो. मादणी, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ)

  • फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Flowers, Fruits & Vegetable Cultivation): 
    श्री. यज्ञेश वसंत सावे (मु. ब्राम्हणगाव, झाई वोरीगाव, पो. वोर्डी, ता. तलासुरा, जि. पालघर)

  • कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent work in social Forestry and Agro Forestry):  
    श्री. श्रीकांत पाठक (भापोसे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट नं-७, दौंड)

  • कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (रेशीम, मधमाशापालन, गांडूळशेती,कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, वराहपालन, कृषीपर्यटन आणि इतर संबंधित उद्योग) (Excellent Work  in Agriculture Allied Industries like, Bee Keeping, Sericulture, Vermiculture, Poultry, Sheep & Goat Rearing, Piggeries, Agro Tourism etc.): 
    श्री. अशोक दशरथ भाकरे (मु.पो. धामोरी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर)

  • कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in the field of Agriculture Extension): 
    डॉ. प्रशांत बबनराव नाईकवाडी (बंगला नं-१, श्रमगाथा सोसायटी, एकता चौक, संगमनेर कॉलेजच्या पाठीमागे, संगमनेर, जि. अहमदनगर)

  • कृषी मालाच्या पणन व्यवस्थेसंबंधी उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Marketing of Agriculture Produce): 
    श्री. मधुकरराव राजाराम सरप (मु.पो. कान्हेरी, सरप, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला)

  • कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महिला शेतकरी (Excellent Work Women Farmer in Agriculture): 
    मेघा विलासराव देशमुख (मु.पो. झरी, ता.जि. परभणी)

 

English Summary: Announced the Doordarshan Sahyadri Krishi Sanman Award 2019 Published on: 04 June 2019, 06:35 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters