भारत देश हा कृषिप्रधान देश आहे शिवाय देशातील 80 टक्के लोकसंख्या शेती व्यवसाय करत आहे. केवळ शेती करणे शेतकरी वर्गाला परवडत नसल्यामुळे शेतकरी बांधव पशुपालन करून आपल्या उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार करतात.
देशात लम्पीरोगाचा वाढता प्रादुर्भाव:-
सध्या देशातील विविध राज्यात जनावरांवर लम्पी या साथीच्या रोगाचा आजार वाढत चालला आहे. या रोगामुळे हजारो लाखो जनावरे मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत, त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. लम्पीरोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. तसेच जनावरांच्या पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. या प्रकारची लक्षणे दिसून येतात शिवाय याचा मोठा परिणाम दुग्ध्यवसायावर झालेला आहे.
लम्पीरोगाचा प्रादुर्भाव या राज्यांमध्ये सुद्धा:-
लम्पी हा रोज जनावरांमध्ये झपाट्याने पसरत चालला आहे हा आजार फक्त महाराष्ट्रात राज्यातच नाही तर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात या राज्यात सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय राजस्थान मद्ये आतापर्यंत 60 हजार जनावरे या आजाराने दगावली आहेत.लम्पी च्या वाढत्या प्रादुर्भावामळे याचा सर्वात मोठा परिणाम हा दुग्ध्यवसाय यावर झाला आहे. त्यामुळे सध्या दुधाचे उत्पन्न घटल्यामुळे दुधाच्या किमती मद्ये सुद्धा वाढ होऊ लागली आहे.
पुढील आदेशापर्यंत बाजार बंद:-
सध्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनावरांचे बाजार बंद केले आहेत. तसेच हा पादुर्भाव जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. लम्पी स्कीन आजाराबाबत संशयित असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाच्या प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे. या मुळे लंपीचा आजार कसा टाळता यावा यासाठी प्रयत्न केले आहेत.
Share your comments