1. बातम्या

....आणि राजू शेट्टी यांच्या हातावर त्यांनी ठेवला 25 हजारांचा चेक! नेमकं काय घडलं, शेट्टींनी केली खास पोस्ट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी काही कामानिम्मीत्त तीन दिवसाचा दिल्ली दौरा करण्याचा योग आला. ही माहिती कळताच एका व्यक्तीचा मला फोन आला साहेब, आपण माझ्या गुडगांव येथील घरी जेवायला येणार का ? मी या निमंत्रणाला नाकारु शकलो नाही आणि त्याच्या विनंतीनुसार संध्याकाळी गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील घरी गेलो.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
raju shetty

raju shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी काही कामानिम्मीत्त तीन दिवसाचा दिल्ली दौरा करण्याचा योग आला. ही माहिती कळताच एका व्यक्तीचा मला फोन आला साहेब, आपण माझ्या गुडगांव येथील घरी जेवायला येणार का ? मी या निमंत्रणाला नाकारु शकलो नाही आणि त्याच्या विनंतीनुसार संध्याकाळी गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील घरी गेलो.

राजू शेट्टी याबाबत एक पोस्ट करून म्हणाले, दारात सुंदर रांगोळी, फुलांचा सडा घालून केलेल्या औक्षणाने मन भारावून गेले. यानंतर आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबीयांसोबत भाकरी, खर्डा, दही असा गावराण बेत असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. भरपेट जेवण आणि मनमोकळ्या संवादानंतर त्यांनी शाल व श्रीफळ देवून माझा कौटुंबिक सत्कार केला.

या सत्कारावेळी त्यांनी माझ्या हातात 'लोकसभा २०२४' साठी २५ हजार रूपयाचा धनादेश दिला. हा सगळा पाहूणचार करणारी व्यक्ती म्हणजे अभिजीत पासाण्णा. तो म्हणाला, साहेब आम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही उसाच्या आंदोलनातून ७०० रुपयांचा दर ३००० रुपयांवर आणला नसता तर माझ्या वडिलांना आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण करता आले नसते आणि आज मी जिथं आहे तिथं स्वप्नात देखील पोहचू शकलो नसतो.

अखेर शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे अनुदान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली महत्वाची माहिती..

अभिजीतचे आयआयटी चेन्नई मधून इंजिनीअरिंगचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झाले, ८ वर्षे जनरल मोटर्स व पीएसए ग्रुप या कंपन्यांमध्ये नोकरी केली. गेल्या तीन वर्षापासून तो दिल्ली गुडगांव येथील डायको या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरींगचा विभागप्रमुख म्हणून काम करत आहे.

देशात गेल्या 10 दिवसांपासून मान्सून ठप्प, पावसाची परिस्थिती चिंताजनक..

त्याचा भाऊ अमेरिकेत 'मर्सिडीझ बेन्झ' कंपनीमध्ये कार्यरत आहे. एका सामान्य ऊस उत्पादकाच्या मुलांचा हा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी ३० वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना आज मनात दाटून आली.

कर्तृत्वाचा सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान
मशरूमची लागवड कशी केली जाते, शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळेल, जाणून घ्या..

English Summary: ....and he placed a check of 25 thousand on the hand of Raju Shetty! What exactly happened, Shetty made a special post Published on: 21 August 2023, 02:53 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters