नाशिक: आनंद अँग्रो केअरने (Anand Angro Care) १३ व्या वर्धापन दिनाचे (Anniversary) औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे (Farmers meeting) आयोजन केले आहे. आज बुधवारी (दि. २८) मधुरम बँक्वेट हॉल, परफेक्ट डाळिंब मार्केटजवळ, औरंगाबाद रोड येथे दुपारी १ वाजता हा मेळावा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी "शेती एक व्यवसाय" (Agriculture is a business) या विषयावर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे-पाटील (Nitin Banugade-Patil) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
त्याचबरोबर २०२२-२३ मधील हवामान अंदाज यावर नामांकित हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख आणि गुणवत्तायुक्त द्राक्ष तयार कशी करावित यावर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे येथील संचालक गणेश मोरे (Ganesh More) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
या मेळाव्यात परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करीत पुन्हा मायदेशात येऊन शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी पुत्रांना "विदेशी शिक्षणाचा ध्यास, भारतीय शेतीचा विकास" या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार; कारण...
शेतकऱ्यानी याचा लाभ घेण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक घनश्याम हेमाडे (Organized by Ghanshyam Hemade) व सहसंचालिका शोभा हेमाडे, व्यवस्थापक राजू आघाव यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात SBI मध्ये 747 जागांची भरती तर पूर्ण भारतात 5000 हून अधिक जागा; असा करा अर्ज
१ ऑक्टोबरनंतर सर्वसामान्य ते शेतकऱ्यांना बसणार महागाईचा फटका! सीएनजी गॅस आणि खतांच्या किमती वाढणार
Share your comments