Maharashtra: गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीच्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काही आमदारांनी बाहेर पडत एक वेगळा गट निर्माण करत भाजपबरोबर राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर ५० खोके घेतल्याची घोषणा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देण्यात आल्या होत्या.
या घोषणानंतर शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार शिंदे गट आणि भाजपवर (BJP) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहायला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर आता सामना (Samana) मुखपत्रातूनही जोरदार टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’
Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने स्वस्त! खरेदी करा 4532 रुपयांनी स्वस्त...
म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे.
Buffalo Farming: आता वाहणार दुधाची गंगा! या 4 जातींच्या म्हशी देतायेत 600 ते 1300 लिटर दूध...
गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की!
महत्वाच्या बातम्या:
LIC scheme: 10 लाखांची गुंतवणूक देईल 35 लाख रुपयांचा नफा; अशी करा गुंतवणूक...
यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गट की ठाकरे गट घेणार? फडणवीस म्हणाले...
Share your comments