Onion News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळं चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा मोठा फटका बसत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या कांद्याला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळं हा कांदा सडू लागला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! गायीच्या दूधदरात 'इतक्या' रुपयांनी घसरण; मात्र पशुखाद्याच्या दरात वाढ
नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय.
शिताके मशरूम शुद्ध शाकाहारी पण देणार अस्सल मटणाची चव; जाणून घ्या सविस्तर माहिती...
दर नसल्यानं शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता. गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरिपाचे गणित बसवता येईल या आशेवर शेतकरी होता. मात्र, साठवलेला कांदा चाळीत सडू लागल्यानं कांदा चाळी फोडून सडलेला कांदा बाजूला करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. खरीपासाठी भांडवल उपलब्ध व्हावं यासाठी मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Share your comments