कृषी क्षेत्रात रोजच काहीतरी नवीन बदल, नवीन शोध, नवीन विक्रम तयार होत असतात, असाच एक नवीन शोध कृषी वैज्ञानीकांनी लावलाय. आता शेतकरी चक्क वांग्याच्या झाडांवर टोमॅटो पिकवतील. हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच खरं पटणार नाही, पण विश्वास ठेवा आम्ही जे सांगतोय ते खरच आहे.
ही गोष्ट पूर्णपणे शक्य आहे आणि हा शोध भारतीय भाजी संशोधन संस्था (IIVR), वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे, ज्याला कलम तंत्र (grafting technique) म्हणतात. सध्या वाराणसीमध्ये यावर काम सुरू आहे आणि प्रयोगासाठी 1000 कलमी टोमॅटोची रोपेही एका शेतकऱ्याला देण्यात आली आहेत.
नेमकी काय प्रकार आहे हा ग्राफ्टिंग टेक्निकचा?
या तंत्रज्ञानामध्ये एक सर्वात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे पाणी कमी असो किंवा जास्त, दोन्ही परिस्थितीत ह्या टेक्निकने चांगले उत्पादन घेता येते.
अहो एवढेच नाही तर समजा आपली शेती खोल ठिकाणी असली आणि पावसाच्या पाण्यामुळे वावरात जास्त पाणी साचले आणि तीन चार दिवस पाणी आटलेच नाही तरी चिंता करायचं काही कारण नाही कारण ह्या टेक्निकणे घेतल्या जाणाऱ्या पिकांना ह्याचा काहीच परिणाम होणार नाही परिणामी उभे पिक जे जास्त पाण्यामुळे सडते ते सडणार नाही आणि शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार नाही. आहे की नाही मग फायद्याचा सौदा.
एवढेच नाही तर या टेक्निकणे घेतल्या जाणाऱ्या भाजीपालाना मुळापासून होणारे रोग होत नाहीत. ह्या ग्राफ्टिंग टेक्निकचा वापर जपान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका इत्यादी विकसित देशांमध्ये आधीच टरबूज, कॅंटलूप, काकडी आणि टोमॅटोसारख्या फळभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला गेला जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद-भारतीय भाजीपाला संशोधन संस्था वाराणसी मध्ये 2013-14 पासून ग्राफ्टिंग टेक्निकवर काम चालू आहे.
सुरवातीला, वांग्याच्या रोपावर टोमॅटो लावून पाणी साचलेल्या जमिनीत त्याची लागवड केली गेली होती.
आता एकाच झाडावर टोमॅटो आणि वांगीचे उत्पादन सुरू होत आहे. शेतात पाणी साचेल किंवा पाण्याची कमतरता भासेल, ह्या कारणावरून शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण अशा दोन्ही परिस्थितीत ह्या टेक्निकणे टोमॅटोचे हेक्टरी 450-500 क्विंटलचे बंपर उत्पादन मिळू शकेल.
कसं बरं तयार झाली झाडे
शास्त्रज्ञांनी सांगितले की 25 ते 30 दिवस जुन्या वांग्याच्या झाडांवर 20-25 दिवस जुन्या असलेल्या टोमॅटोच्या झाडाचा वरचा भाग V आकाराचा कापून आणि कलम जीभच्या आकारात कापला गेला आणि क्लिपद्वारे चिटकवला गेला. यानंतर, 15 ते 20 दिवसांनी चांगली निगा घेतल्यानंतर, कलमी झाडे पुनर्लावणीसाठी तयार झाली.
नेमका ह्या ग्राफ्टिंग टेक्निकचा फायदा काय
ह्या नवीन कलम केलेल्या प्रजातीचा फायदा म्हणजे 72-96 तास वावर पाण्याने भरलेले असले तरीही ह्या टेक्निकणे कलम केलेली झाडे खराब होत नाहीत, तर टोमॅटोच्या इतर प्रजाती 20 ते 24 तासांपेक्षा जास्त काळ पाणी साठून राहिल्यास खराब होतात. याशिवाय, ह्या पद्धत्तीने कलम केलेली झाडे यांची लागवड देखील खूप सोपी आहे. कलम केलेली झाडे गच्चीवर आणि कुंड्यांमध्ये सहज लावता येतात. शेतकरी ह्या पद्धत्तीने कलम केलेल्या झाडांच्या लागवडीतून चांगला नफा कमवू शकतो.
Share your comments