केंद्राकडून ठिबक सिंचन अनुदानासाठी निधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासाठी राज्य शासन व केंद्र शासन यांचा एकत्र करून अंदाजे 300 कोटींच्या अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठिबक संच बसवलेले शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते त्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी दोनशे कोटी चा पहिला हप्ता केंद्राकडून मिळण्याची शक्यता असून हा केंद्राचा निधी मिळाल्याबरोबर राज्य शासनाच्या हिश्यापोटी 100 कोटी जमा होतील. या जमा होणाऱ्या तीनशे कोटी अनुदाना मधून विविध जिल्ह्यातील ठिबक सिंचनाच्या थकित अनुदानाचा प्रश्न मिटणार आहे.
याचा लाभ जवळजवळ एक लाख 30 हजार शेतकऱ्यांना मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यावर्षी पंतप्रधान कृषी सिंचन योजने मध्ये केंद्र सरकारने खर्चाचे मापदंड हे 10 ते 13 टक्क्यांनी वाढवले असल्यामुळे शेतकऱ्यांना या वेळेस जास्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून देखील 200 कोटींचे पूरक अनुदान उपलब्ध झाले आहे. यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 80% तर बहुभुधारक शेतकऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे.
राज्यातील जवळजवळ एक लाख 33 हजार 872 शेतकऱ्यांनी सन 2021 ते 22 या वर्षातील ठिबक संच खरेदी बिलेदेखील महाडीबीटी प्रणाली अंतर्गत अपलोड केलेली असून त्यापैकी 39 हजार 938 शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचे अनुदान वाटण्यात आलेले आहे
Share your comments