सोलापूर
सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकून दिल्याची घटना घडली आहे. बीडमधील शेतकऱ्यांनी सोलापूर बाजारात विक्रीसाठी कोथिंबिर आणली होती पण भाव न मिळाल्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीत कोथिंबीर विकण्यासाठी आणली होती. या शेतकऱ्यांना बीडवरून सोलापूरला कोथिंबीर आणण्यासाठी एका कॅरेटला ५० रुपये खर्च आला होता. पण कोथिंबीरच्या एका कॅरेटला केवळ दहा रुपये दर मिळाला. यामुळे प्रचंड संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकून दिली.
शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकल्यानंतर अनेकांनी ही कोथिंबीर जनावरांना चारण्यासाठी नेली. तसंच काही महिलांनी हिच कोथिंबीर खाऊक बाजार विकण्यासाठी नेली आहे.
दरम्यान, सरकारने शेतमाल बाजाराभावबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. पिकाला हमीभाव द्यावा. सातत्याने शेतकरी अडचणीत सापडत असल्याने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवा शेतकऱ्याने सरकारकडे केली आहे.
Share your comments