1. बातम्या

मंदीतही अमूल ने केले शेतकऱ्यांचे २०० कोटींचे पेमेंट

KJ Staff
KJ Staff

 

देशासह राज्यात कोरोना व्हायरस (covid-19) मुळे उद्योग बंद आहेत.   यामुळे नागरिकांना आपल्या नोकरीची आणि मिळणाऱ्या वेतनची चिंता आहे. अशा चिंतेत मात्र अमूल(Amul) कडून शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी हाती आली आहे.  अमूल(Amul) ने शेतकऱ्यांचे पेमेंट केले असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २०० कोटी रुपयांचे पेमेंट अदा केले आहे. राज्यातील डेअरी व्यवसाय अतिशय बिकट अवस्थेतून वाटचाल करत आहे. मात्र अमूलचा विकास हा अनेकांच्या भुवया उंचावणाऱा आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात येत आले आहे.

यामुळे दुधाला मागणी नसल्याचे सांगून राज्यातील संकलकांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे खरेदी दर १८ ते २२ रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान अमूल मात्र २५ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देत आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर २८ ते २९ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४० ते ४२ रुपये दर दिला जातो आहे. मंदी सांगितली जात असली तरी अमूलकडून १७ लाख लिटर दुधाची खरेदी सुरळीतपणे चालू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या चांगल्या दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी अमूलने सध्या ११०० दूध संकलन केंद्रे उभारली आहेत. दीड लाख शेतकऱ्यांचे दूध जमा करण्यासाठी मुंबईत सहा तर पुणे, औरंगाबाद, व नागपूरला प्रत्येकी एक असे ९ प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे संकलित केलेले १६ ते १७ लाख लिटर दूध पुन्हा पिशवीबंद करुन राज्यामध्येच विकण्याचे तंत्र अमूल ने ठेवले आहे. राज्याच्या दुग्ध व्यवसायात शेतकऱ्याला पादर्शकता आणि गुणवत्ता अशा दोन्ही पातळ्यांवर अमूलने मोठा आधार दिला आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters