1. बातम्या

प. बंगाल-ओदिशाच्या समुद्रकिनारी सायंकाळी धडकणार अम्फान चक्रीवादळ

नवी दिल्ली - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अम्फान आज सायंकाळनंतर पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास १८५ किमी असू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


नवी दिल्ली- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अम्फान आज सायंकाळनंतर पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकण्याची शक्यता आहे.  त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास १८५ किमी असू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  तर ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील जिल्हे हाय अलर्टवर आहेत. ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.

बंगालच्या उपसागरात शनिवारी रात्री उशिरा अम्फान चक्रीवादळाची निर्मिती झाली. दोन दिवसापासून या वादळाची तीव्रता वाढत गेली. सोमवारी या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. मंगळवारी अम्फान अंशत: कमकुवत झाले असले तरी धोका टळलेला नाही. पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांचे नुकसान होईल, एवढी ताकद या चक्रीवादळात अद्याप आहे. त्यामुळे या दोन राज्यांमधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ताशी २२५ ते २४५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या या वादळी प्रणालीचे केंद्र सकाळी ओडिशाच्या परादीपपासून ४४८० किलोमीटर, पश्चिम बंगालच्या दिघासाून ६३० किलोमीटर दक्षिणेकडे होते. पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यापासून ५१० किमी अंतरावर बंगालच्या खाडीत या चक्रीवादळाचं केंद्र आहे. त्यामुळे हे वादळ उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. याचे केंद्र ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहेत.

मंगळवारी या वादळाची तीव्रता काहीशी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी हे वादळ पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.  चक्रीवादळाचा धोका पाहता राज्य सरकारांसह केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बाचतीच करुन केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दुसरीकडे कोलकातामध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला असून पाऊस सुरु आहे. बंगालमध्ये भूस्खलनाची शक्यताही वर्तवली जात आहे. अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये आतापर्यंत एनडीआरएफची एकूण ४१ पथके तैनात करण्यात आली आहेत. 

English Summary: amphan cyclone will hit beach today evening Published on: 20 May 2020, 01:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters