नवी दिल्ली- सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच देशव्यापी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासह विदेशातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहे. सहकार मंत्री अमित शाह यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातील सहकारी क्षेत्रास जागतिक स्तरावर संधी प्राप्त करून देणे आणि सहकारास बळकटी प्राप्त करणे हा संमेलनाच्या आयोजनामागील उद्देश आहे. सहकार मंत्रालयाने संमेलनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ट्विटरवर जाहीर केली आहे.
सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह हे पहिल्यांदाच देशभरातील सहकारी संस्थांना संबोधित करणार आहेत. इफ्को, सहकार भारती, नाफेड, कृभको आदी देशभरातील संस्थांनी सहकार संमेलनाच्या आयोजनात भूमिका बजावली आहे. देशभरातील सुमारे दोन हजार प्रतिनिधी संमेलनास उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
स्वतंत्र सहकार मंत्रालय:
'सहकारातून समृद्धी' हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्वतंत्र मंत्रालय बनवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या मंत्रालयाची घोषणा केली होती.
नव्या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक रचना उपलब्ध केली जाईल. सहाकरी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल.
Share your comments