1. बातम्या

ॲमेझॉन रिटेल ने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू केली अग्रोनोमी सर्विस

agronomy service

agronomy service

 ॲमेझॉन रिटेल ने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी विज्ञान सेवा म्हणजेच अग्रोनोमी सर्विसेस सुरू करण्याची घोषणा केली. या सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयी योग्य सल्ला दिला जाईल तसेच पिकांविषयी व केल्या जाणाऱ्या शेतातील कामांविषयी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवेल.

.तसेच अग्रोनोमी सर्विस दर्जेदार उत्पादनासाठी मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी सादर करीत आहे तसेच एक मजबूत सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर ची निर्मिती करणार आहे.

 मोबाईल ॲप द्वारे मिळेल महत्वपूर्ण माहिती

 ॲमेझॉन इंडीया चे डायरेक्टर समीर खेत्रपाल यांनी सांगितले की,  आम्ही भारतीय शेतकरी आणि शेतकरी समुदायांना कृषी उत्पन्न आणि फळ,भाजीपाला यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी लागणाऱ्या अत्युच्च टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सशक्त बनवण्याचे आमच्या भूमिकेबद्दल उत्साहित आहोत. तसेच ते पुढे म्हणाले की हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम असून जो शेतकऱ्यांना माती आणि हवामान यांच्या स्थितीनुसार वैज्ञानिक पिक योजनेच्या उपयोग करण्याच्या बाबतीत सक्षम बनवतील.

 अग्रोनोमी सर्विसेस चे फायदे

 अग्रोनोमी सर्विसेस द्वारे ॲमेझॉन रिटेलनेकृषी वैज्ञानिक यांच्या फिल्ड हस्तक्षेप आणि या हस्तक्षेपच्या प्रभावी देखरेखीसाठीएक फार्म मॅनेजमेंट टूल्सच्या माध्यमातूनएक इकोसिस्टम तयार केली आहे. या फार्म मॅनेजमेंट टूल मध्ये समाविष्ट प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्यांना वेळेत हस्तक्षेप दिला जाईल ज्याची शेतकऱ्यांना आवश्यकता आहेव ते त्यांच्यासाठी मूल्यवर्धकआहे. कृषी वैज्ञानिकांची एक टीम दर्जेदार कृषी उत्पन्न आणि उत्पादन गुणवत्ता त्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना एक एग्रीटेक सल्ला प्रदान करतील तसेच हे कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांना व्यापक तत्त्वावर वैज्ञानिक आणि नेमका सल्लाउपलब्ध करतील.

 या कार्यासाठी मशीनचा उपयोग केला जाईल

 ॲमेझॉन रिटेल अग्रोनोमी सर्विसेस मशीन लर्निंग आणि कम्प्युटर विजन आधारावरअल्गोरिदम च्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन इंटर्फेस आहे. जे पुरवठा साखळीच्या प्रक्रियेला सोपे बनवते तसेच शेतकऱ्यांच्या फळे आणि भाजीपाला असलेले दोष जसे की भाजीपाला सडणे, फळा वरील डाग इत्यादींची ओळख करण्यात  मदत करते व उत्पादन खराबहोण्याच्या प्रमाणात घट करते. याचा परिणाम असा होतो की ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे फळे आणि भाजीपाला उपलब्ध होतो.

 

 महाराष्ट्रातील मांजरा वाडी येथील शेतकरी दर्शन दौलत खानदागलेअग्रोनोमी सर्विसेस चावापर करीत आहेत त्यांनी सांगितले की, मी ॲमेझॉन च्या अग्रोनोमी सर्विसेस मध्ये फुलकोबी साठी रजिस्टरआहे. आणि मार्गदर्शनासाठी नियमितपणे तज्ञ आमच्या शेतात येत असतात. तसेच त्यांनी सांगितले की त्यांना या ॲपच्या मदतीने एक विकसित प्लान मिळाला आहे ज्या माध्यमातून ते शेतात काही पिकांना नकोशा गोष्टी दिसल्या तर त्या बाबतीत ते अलर्ट पाठवू शकतात.मागच्या हंगामातयोग्य वेळेत योग्य उपाय केल्यामुळेत्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आणि त्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters