भारतात पशुपालन हे मोठ्या प्रमाणात केले जाते. अनेक शेतकरी म्हशीचे तसेच गाईचे पालन करतात आणि त्यातून चांगली बक्कळ कमाई करतात. भारतात पशुचे पालन जसे मोठया प्रमाणात होते तसेच पशुची खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी संपूर्ण भारतात पशु खरेदी विक्री साठी मोठं-मोठे बाजार भरतात. अनेक राज्यात पशुच्या विक्रीसाठी पशुमेला आयोजित केला जातो.
महाराष्ट्रात देखील सारंगखेडा येथे पशु विक्री साठी मोठी जत्रा भरते, ह्या अशा जत्रेत शेती संबंधी इतर वस्तूंची देखील खरेदी विक्री केली जाते. अशीच जत्रा इतर राज्यात देखील भरते, ह्या जत्रेत अनेक कृषी प्रॉडक्ट्स हे प्रदर्शनी म्हणुन ठेवले जातात तर काही प्रॉडक्ट्स हे विक्रीसाठी सुद्धा ठेवलेले असतात. ह्या प्रकारचा एक बाजार हा जोधपूरला देखील भरतो, जोधपूरला दरवर्षी हा पशुचा बाजार हा भरत असतो. तिथे अनेक पशुपालक शेतकरी आपल्या पशुना खरेदी विक्रीसाठी नेतात. ह्या वर्षी जोधपूर मधला हा पशुमेला हा चांगला चर्चेत राहिला कारण ह्या बाजारात भीम नावाचा रेडा देखील आला होता. हा रेडा महाकाय आहे आणि ह्याचे वजन चक्क 1500 किलोच्या आसपास असल्याचे सांगितलं जाते. ज्याला पाहुण मेला फिरायला आलेले लोक चांगलेच हक्के-बक्के राहिले. ह्या रेड्याने अनेक प्राणी प्रेमी लोकांचे आपल्याकडे लक्ष ओढून घेतले.
हा रेडा अजूनच चर्चेत आला जेव्हा ह्या रेड्याला तब्बल 24 कोटींची बोली हि लागली. किंमत ऐकून आपला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. ह्या रेड्याची किमत ऐकून आपल्या लक्षात आलेच असेल की हा काही साधारण रेडा नाही तर एक विविवायपी रेडा आहे. ह्या विविआयपी रेड्याच्या मालकाचे नाव अरविंद जंगीड असे आहे.
अरविंद जागड यांच्या मते, जोधपूर मध्ये त्यांच्या भीम ह्या रेड्याला 24 करोड रुपयाची बोली लागली. हि बोली अफगाणिस्तान मधून आलेल्या एका अफगाण शेख ने लावली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु रेड्याच्या मालकाने ह्याला विकायला नकार दिला. अरविंद ह्यांनी सांगितलं की ते आपला भीम विकणार नाही आहेत, मेल्यामध्ये ते आपला रेडा फक्त प्रदर्शनी साठी घेऊन आले होते.
भीम रेड्याला मिळालेत अनेक पुरस्कार
मित्रांनो भीमाचे मालक अरविंद सांगतात की, याआधीही तो त्याला 2018 आणि 2019 मध्ये पुष्कर जत्रेत घेऊन गेला होता. याशिवाय बालोत्रा, नागौर, डेहराडूनसह अनेक जत्रांमध्ये ते घेऊन गेले जेथे भीमाला अनेक पुरस्कार मिळाले. अरविंद इक्षुक हे भीमाचे वीर्य पशुपालकांना विकतात. ह्या भीमाच्या सीमनला मोठी मागणी आहे आणि हा रेडा पशुपालन करणाऱ्या लोकांमध्ये खुप लोकप्रिय आहे.
Share your comments