बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारे मल्ल्या, मेहुल चोकसी, निरव मोदी सारखे भामटे त्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडून परदेशात लपून बसले आहेत.
परंतु सर्वसामान्य शेतकरी राजाला मात्र अशा बँका आजही या ना त्या कारणाने त्रास देताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला असून गुजरातमध्ये हा प्रकार घडलेला आहे. एसबीआय सारख्या बँकेने संताप आणणारा हा प्रकार केला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, गुजरात मधील एका शेतकऱ्याने एसबीआय कडून कर्ज घेतलेले होते, या कर्जाची परतफेड देखील संबंधित शेतकऱ्याने केलेली आहे. परंतु केवळ 31 पैसे या शेतकऱ्याच्या खात्यावर थकीत दिसत होते. मध्यंतरी शेतकऱ्याने त्याची जमीन विकली परंतु बँकेने त्याला एनओसी देण्यास नकार दिला आणि हे प्रकरण जास्तच चिघळलं. कर्जाचे 31 पैसे थकीत दाखवून या शेतकऱ्याला या बँकेने एनओसी दिली नाही. तेही पैसे भरले तरी सुद्धा बँकेने एन ओ सी द्यायला नकार दिला. शेवटी या शेतकऱ्याने स्टेट बँकेच्या विरोधात उच्चन्यायालयात धाव घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याची जमीन घेतलेला खरेदीदार उच्च न्यायालयात पोहोचले. बँकेने न्यायालयाला कृषी कर्जावरील रक्कम भरली परंतु त्याच्या नावावर 31 पैसे थकित दिसत आहे. त्यामुळे एनओसी दिली नाही असे कारण बँकेनेसांगितले. या बँकेच्या म्हणण्यावर न्यायमूर्ती भार्गव करिया यांनी खूपच अति झाले असे म्हणत एवढ्या शिल्लक रकमेसाठी एनओसी न देणे हा एक प्रकारचा अत्याचार आहे, कशा कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच 50 पैशापेक्षा कमी रक्कम असेल तर तिकडे एवढे लक्ष दिले जात नाही हे तुम्हाला माहिती नाही का? अशा शब्दात उच्च न्यायालयाने बँकेला फटकारले असून यावर बँकेकडून उत्तर मागितले असून प्रतिज्ञापत्र जमा करायला सांगितले आहे. आकाश वर्मा आणि मनोज वर्मा यांनी खोराज गावच्या संभाजी पाशाभाई यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली होती. ही जमीन अहमदाबाद शहराच्या बाहेर असून पाशाभाई यांनी एसबीआय कडून कृषी कर्ज घेतले होते व ते फेडले देखील, परंतु त्यांच्या नावावर त्यातील 31 पैसे शिल्लक असल्याचे दिसत होते.
यातील मजेशीर गोष्ट म्हणजे हा बँकेने लावलेला चार्ज होता. याविरोधात 2020 मध्ये ते न्यायालयात गेले तसेच 31 पैसे देखील त्यांनी बँकेचे भरले. तरीही संबंधित शेतकर्याला बँकेने एनओसी देण्यास नकार दिला.(स्रोत-लोकमत )
महत्वाच्या बातम्या
Share your comments