1. बातम्या

शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्यात रेशीम शेतीचा पर्याय गरजेचा : अजय मोहिते

कृषी विज्ञान केंद्रामार्फत दर महिन्याच्या ५ तारखेला कृषी विज्ञान मंडळाचे मासिक चर्चासत्राचे आयोजन केले जाते, कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे कृषि विज्ञान मंडळाचे २९६ वे मासिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
रेशीम शेतीचा पर्याय गरजेचा

रेशीम शेतीचा पर्याय गरजेचा

कृषी विज्ञान केंद्रामार्फत दर महिन्याच्या ५ तारखेला कृषी विज्ञान मंडळाचे मासिक चर्चासत्राचे आयोजन केले जाते, कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे कृषि विज्ञान मंडळाचे २९६ वे मासिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोयाबीन लागवडीची पूर्वतयारी रेशीम उद्योगाचे अर्थशास्त्र व लागवडीची पूर्वतयारी या विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्हेत्रे तर जालना जिल्ह्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी मार्गदर्शन केले. रेशीम शेतीतून शेतकऱ्यांनी सक्षम व समृद्ध व्हावे असे मत मोहिते यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : सूर्यफुल अन् करडईचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या कारण

डॉ. म्हेत्रे यांनी ऑनलाईन पद्धतीने सोयाबीनवर मार्गदर्शन करताना सांगितले की मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, गाळाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते. हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते. ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या आसपास आणि विद्युतवाहकता ४.० डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास जमिनीत सोयाबीन उत्तम येते तर उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके बीजप्रक्रिया करावी.

 

लागवड ते काढणीचे नियोजन 

रेशीम शेतीच्या पहिल्या वर्षी जुन ते जुलै दरम्यान एक एकरात तुती लागवड केल्यास डिसेंबरमध्ये पहिले पीक येते. दुसऱ्या वर्षी मे ते जुन दरम्यान तुतीची तळ छाटणी करुन जुलै ते ऑगष्ट दरम्यान पहिले पीक घेता येते. ऑक्टोंबर मध्ये दुसरे व जानेवारी मध्ये तिसरे व मार्च ते एप्रिल दरम्यान चौथे पिक घेता येते. दुसऱ्या वर्षी चारही पिके मिळून ५०० किलो कोष उत्पादन शेतकरी घेवू शकतो. रेशीम उद्दोगाचे अर्थशास्त्र सांगतांना शेतकऱ्यांनी विविध टप्प्यांवर या उदोगातून पैसे मिळतात तसेच हवामानातील बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धती सुद्धा बदलून रेशीम उद्योग करून आर्थिक क्षमता वाढवावी असे मत त्यांनी व्यक केले.

English Summary: Alternatives to silk farming needed to help farmers financially: Ajay Mohite Published on: 06 April 2022, 08:59 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters