यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जे की पंढरपूर मधील कासेगाव आणि तळणी या गावांमध्ये तर द्राक्ष संबंधी वेगळाच प्रकार घडलेला आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या सतत बदलाचा प्रादुर्भाव द्राक्षच्या बागांवर झाल्यामुळे कासेगाव आणि तळणी या परिसरातील शेतकऱ्यांनी बागेवर क्लोरपारिफॉस या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे रोगराई नष्ट होईल असे अपेक्षित होते मात्र याउलट घडले आहे जे की द्राक्षाच्या बागा पूर्णपणे जळाल्या आहेत आणि घड सुद्धा सुकले आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. क्लोरपारिफॉस या रासायनिक कीटकनाशकाची तपासणी प्रयोगशाळेत व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. चार दिवसानंतर या कीटकनाशकाची तपासणी झाली असून असे समजले आहे की त्यामध्ये चक्क तणनाशकाचे अवशेष आहेत यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. पुण्यातील खाजगी प्रयोगशाळेत या कीटकनाशकाची तपासणी झालेली आहे.
नेमका प्रकार काय?
मध्यंतरीच्या काळात वातावरणाच्या सतत बदलामुळे द्राक्षाच्या बागेवर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. मात्र अंतिम टप्यात द्राक्षाच्या बागेची नुकसान होऊ नये म्हणून कासेगाव आणि तळणी परिसरातील शेतकऱ्यांनी बागेवर फवारणी करण्यासाठी क्लोरपारिफॉस हे कीटकनाशक आणले होते. या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर द्राक्षाच्या बागेची सुधारणा होण्याऐवजी द्राक्षेची बाग पूर्णपणे जळाली आहे तर द्राक्षेचे घड कुजले आहेत. अगदी शेवटच्या टप्यात हे सर्व काही घडले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे की या कीटकनाशकामुळे हे सर्व काही घडले असावे. ज्या कृषी केंद्रातून हे कीटकनाशक आणले आहे त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या कीटकनाशकाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत दिले.
क्रीयशील घटकाचे प्रमाण कमी :-
द्राक्षाच्या बागेवरील रोगराई नष्ट होण्यासाठी कंपनीने क्लोरपारिफॉसचे या कीटकनाशकाचे प्रमाण १.५ असे दिले आहे. मात्र ज्यावेळी प्रयोगशाळेत याची तपासणी केली त्यावेळी याचे ०.५२ प्रमाण असल्याने समोर आले आहे. या रासायनिक कीटकनाशकाचा यावर कोणताही परिणाम झाला नाही मात्र यामध्ये ग्लायफोसेटचे प्रमाण ०.६०२ मिलीग्रॅम होते जे की यावरून समजले की यामध्ये तननाशकाचे प्रमाण जास्त आहे.
शेतकऱ्यांची कारवाईची मागणी :-
निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जे की द्राक्षाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. जे की यंदा द्राक्ष लागवडीसाठी खर्च ही वाढला आहे आणि यामध्ये असे औषधे फवारणी केले असल्याने कासेगाव आणि तळणी या गावातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई करावी अशी मागणी कृषी विभागाकडे केलेली आहे.
Share your comments