1. बातम्या

ग्रामनेटच्या माध्यमातून सर्व गावे लवकरच वायफायने जोडली जाणार

नवी दिल्ली: सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून, कनेक्टिविटीचा 10 जीबीपीएसपर्यंत विस्तार होऊ शकतो, असे दूरसंवाद राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले. ते नवी दिल्ली येथे सी-डॉटच्या 36 व्या वर्धापनदिन समारंभात बोलत होते.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून, कनेक्टिविटीचा 10 जीबीपीएसपर्यंत विस्तार होऊ शकतो, असे दूरसंवाद राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले. ते नवी दिल्ली येथे सी-डॉटच्या 36 व्या वर्धापनदिन समारंभात बोलत होते.

सी-डॉटच्या XGSPON चा यादृष्टीने मोठा उपयोग होणार आहे. स्वयंपूर्ण भारतीय गावाचे स्वप्न पाहिलेल्या महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी होत असताना, ही झेप त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे धोत्रे यांनी सांगितले.

सी-डॉटच्या XGSPON, C-Sat-Fi आणि CiSTB या नव्या उत्पादनांचा प्रारंभ आज झाला. सी-डॉटच्या सी-सॅट-फाय तंत्रज्ञानामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही मोबाईल फोनवर, फोन आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध होईल; ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या लोकांना याचा मोठा फायदा होईल, असे धोत्रे यांनी सांगितले.

English Summary: All villages will soon be connected via WiFi through Gramnet Published on: 28 August 2019, 08:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters