
ajit pawar devendra fadnavis
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात जातील अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे.
अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत.
यामुळे ते कशासाठी गेले आहेत. हे लवकरच समजेल. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे. आज पुण्यात अजित पवारांचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन, मोटार सायकल रॅली, नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व नळ पाणी पुरवठा योजना भूमीपूजन असे कार्यक्रम पुण्यात होते.
पिवळ्या कलिंगडाला मोठी मागणी! शेतकरी होतोय मालामाल...
असे असताना मात्र सदर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार हे अद्याप मुंबईतच आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अजित पवार यांनी फेटाळले आहे.
शेतकरी मुलांच्या लग्नासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, मुलीला 10 लाख देण्याची मागणी...
तर दुसरीकडे शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी अजित पवारांचं भाजप आणि शिवसेना युतीत स्वागत करू असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले आहे .
उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..
शेतकऱ्यांनो शेतीच्या अवजारांची अशा प्रकारे राख निगा आणि देखभाल..
शेतकऱ्यांनो आता जमीन मोजणी झाली अचूक आणि गतिमान, जाणून घ्या..
Share your comments