राज्यात शेतकरी बांधव दिवसेंदिवस नवनवीन पीक पद्धतीचा अवलंब करीत मोठे यश संपादन करीत आहेत. नवीन पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. अशाच नवीन पीक पद्धतीचा अवलंब केला खानदेशी रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याने. तसं बघायला गेलं तर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोनच विभागात ओव्याची लागवड केली जाते. ओवा अर्थात अजवाइन भारतीय स्वयंपाक घरातला एक नामी मसाल्याचा पदार्थ आहे, मिठा विना जसा स्वयंपाक कळना बनतो तसाच ओव्या विना स्वयंपाकाला कुठलीच चव प्राप्त होत नाही असे सांगितले जाते. या अशा गुणकारी ओव्याची विदर्भात आणि मराठवाड्यात होत असलेली शेती आता खानदेशात नजरेस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. संपूर्ण खानदेश मध्ये केवळ नंदुरबार जिल्ह्यातच गोवा उत्पादित केला जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात केवळ नंदुरबार असा एकच जिल्हा आहे ज्या जिल्ह्याने ओव्याची शेती करून शेती क्षेत्रात एक नवीन पायंडा घालून दिला व आपल्या यशस्वी व अनोख्या प्रयोगामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला.
जिल्ह्यात केवळ नंदुरबार तालुक्यातच ओव्याची शेती केली जात आहे. तालुक्यात यावर्षी देखील शेतकऱ्यांनी ओव्याचे दर्जेदार उत्पादन प्राप्त केले आहे, तालुक्यात उत्पादित झालेला ओवा खरेदी करण्यासाठी मराठवाडा व विदर्भात ऊन व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर गाड्या लावत आहेत. यावर्षी विदर्भात तसेच मराठवाड्यात ओव्याच्या उत्पादनात कमालीची घट घडून आली आणि परिणामी मराठवाड्यातले व विदर्भातले व्यापारी ओवा खरेदीसाठी खानदेशात दाखल झाले. ओव्याच्या उत्पादनात घट झाली असल्याने नंदुरबार मधील ओव्याला सुमारे 15 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात ओव्याची शेती विशिष्ट भागातच केली जाते. राज्यात ओवा लागवड फक्त मराठवाडा विदर्भमध्ये केली जातं होती आणि आता खानदेशी रत्न नंदुरबार मध्ये देखील केली जाऊ लागली आहे. ओवा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, ओवा लागवडीसाठी मध्यम ते हलकी जमीन उपयोगी असते, या जमिनीत लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते असा ओवा उत्पादक शेतकऱ्यांनी दावा केला आहे. या पिकासाठी पाणीदेखील मध्यम स्वरूपाचे लागत असते. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यासमवेतच जिल्ह्यातील पश्चिम भागात रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकात आंतरपीक म्हणून ओव्याची लागवड नजरेस पडते.
नंदुरबार जिल्ह्यात ओव्याचे क्षेत्र हे खूप कमी आहे मात्र ओव्याची क्वालिटी उत्तम असल्याने व्यापाऱ्यांनी आता नंदुरबार कडे आपला मोर्चा वळवला असल्याचे बघायला मिळत आहे. ओवा पिकासाठी सुमारे 40 हजार रुपये हेक्टरी खर्च येत असल्याचे सांगितले जाते तसेच त्यापासून हेक्टरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन सहजरित्या मिळत असते असे देखील शेतकरी बांधव सांगत आहेत. अजवाईनला साधारणत आठ हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत असतो सध्या नंदुरबार मध्ये 14 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. चाळीस हजार रुपये खर्च करून हेक्टरी सव्वा लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन शेतकरी बांधव प्राप्त करत असल्याचे सांगितले जात आहे. अत्यल्प खर्च आणि हमखास उत्पादन यामुळे नंदुरबार जिल्ह्यात ओवा लागवड केली जात आहे आणि भविष्यात याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा वातावरणाचा विपरीत परिणाम अजवाइन पिकावर झाला मात्र असे असले तरी गतवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन चांगले मिळाले असल्याचे जिल्ह्यातील शेतकरी सांगत होते. नंदुरबार मध्ये ओवा उत्पादित केला जातो मात्र याच्या खरेदीसाठी व्यापारी खूपच कमी आहेत नंदुरबारमध्ये केवळ दोन व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ओव्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याचे शेतकरी तक्रार करत आहेत. असे असले तरी यंदा विदर्भातले तसेच मराठवाड्यातले व्यापारी नंदुरबार मध्ये दाखल झाले असल्याने ओव्याला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याचे समजत आहे.
Share your comments