माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन २०२२-२३ या ऊस गळीत हंगामाचा अंतिम दर ३४११ रुपये प्रतिटन इतका जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीपेक्षा ५६१ रुपये अधिक मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच गेटकेनधारक शेतकऱ्यांना ३१०० रुपये प्रमाणे अंतिम ऊस बिल आदा होणार आहे. सध्याला एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात माळेगाव राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला शब्द खरा केल्याची चर्चा परिसरात आहे.
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. माळेगावने गतवर्षीच्या हंगामात १२ लाख ५७ हजार ४६५ में.टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा ७ लाख २६ हजार, तर गेटकेनधारकांचा ५ लाख ३३ हजार में.टन उसाचे गाळप केले होते.
तसेच ११.८१ टक्के रिकव्हरीनुसार १३ लाख २८ हजार ९०० क्विंटल साखर निर्मिती केली होती. सहविजनिर्मितीतून ५ कोटी ४९ लाख ७० हजार युनिटची वीजविक्री केली. यामुळे कारखान्याला फायदा झाला.
माळेगावची एफआरपी २८५१ प्रतिटन इतकी असून आत्तापर्यंत सभासदांना एफआरपी व १०० रुपये कांडेपमेंटसह २९५१ रुपये दिले आहेत. आता उर्वरित प्रतिटन ४६० रुपये इतकी समाधानकारक रक्कम आगामी काळात सभासदांना मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित होणार
तसेच गेटकेनधारकांना याआगोदर दिलेली २८५१ रुपये वगळता उर्वरित २४९ रुपये मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केले होते. आता त्यांनी आपला शब्द खरा केला आहे.
Share your comments