Ajit Pawar: काल शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग (Govindbagh Baramati) या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली.
अजितदादा आणि मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनीही आपलं मत मांडले आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. त्यांच्याकडे बहुमत आलं. तर निश्चितपणे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
भारताच्या बायोटेक रेग्युलेटर GEAC ने GM मोहरीच्या व्यावसायिक लागवडीस मान्यता
अजित पवार राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. जितकं झपाटून काम करतात तितकंच रोखठोक बोलतात. काम होणार असेल तर त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवतात. पण जर काम होणार नसेल तर स्पष्ट नकार देतात, ही त्यांची ख्याती आहे.
घामाच्या दामाला योग्य भाव न मिळाल्यास साखर आयुक्तांची खुर्ची जाळू- अतुल खूपसे-पाटील
पण मुख्यमंत्रीपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली आहे. आतापर्यंत त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागलंय. ते चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत. पण आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
Share your comments