1. बातम्या

Ajit Pawar : 'माझ्या मुलाने डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावे'; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लोकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे, बारामतीमधील जनताही आमच्या सोबत आहेत. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखत दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, असं आशाताई पवार म्हणाल्या आहेत.

Grampanchyat News

Grampanchyat News

Pune News : पुणे जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींसाठी आज (दि.५) मतदान पार पडत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात देखील ग्रामपंचायतसाठी मतदान पार पडत आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी पवार कुटुंब बाहेर पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लोकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे, बारामतीमधील जनताही आमच्या सोबत आहेत. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखत दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, असं आशाताई पवार म्हणाल्या आहेत.

अजित पवार यांच्या काटेवाडीत गावात अजित पवार यांचे वर्चस्व आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे. परंतु गावातील लोक आपल्या सोबतच आहे. आमचा विजय निश्चित आहे, असंही आशाताई पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
पुणे जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार, बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आंबेगाव ग्रामपंचायत मध्ये खासदार अमोल कोल्हे, खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते पाटील या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पणाला लागलेली आहे.

दरम्यान, राज्यातील २ हजार ३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २० हजार ५७२ जागा आहेत. या सर्व २ हजार ३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय २ हजार ६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २ हजार ९५० जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही आज पोटनिवडणूक पार पडत आहे.

English Summary: Ajit Pawar should be Chief Minister Ajit Pawar mother wish maharashtra politics Published on: 05 November 2023, 11:13 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters