Ajit Pawar, Sharad Pawar News
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचवल्या आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा दावा ही शरद पवार यांनी केलं आहे. ते बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार नेमकं काय म्हणाले, "अजितदादा आमचेच नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही," असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील (दि.२४) रोजी अजित पवार आमचेच नेते आणि राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं विधान केलं होतं. त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. या विधानामुळे नेमकं राष्ट्रवादीत चाललंय काय? असा सवाल उपस्थित झाला. त्यापाठोपाठच शरद पवार यांनी देखील अजित पवार आमचे नेते असल्याच विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आगामी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील, अस वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना आज ना उद्या वाटेलच मोदीजी या देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे शरद पवार आमच्यासोबत कधी ना कधी येतील असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
Share your comments