मुंबई, सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणारे 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान 10 हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. याची एक महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी 3 वर्षात 1 हजार कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे त्यांना मदतीची मागणी केली जात होती. राज्याचा अर्थसंकल्प हा 5 सूत्रांमध्ये मांडला गेला आहे. यामध्ये सर्वाधिक महत्व हे (Agricultural) शेती व्यवसयाला देण्यात आले असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंतच्या योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. (Budget) अर्थसंकल्पाची सुरवातच शेती या विषयाने झाली असून ठाकरे (State Government) सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प होता.यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शेती व्यवसायासाठी महत्वपूर्ण आशा 13 घोषणा करण्यात आल्या आहेत. विकासाची पंचसूत्री-कृषी,आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद करण्यात आली आहे. तसेच भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी करण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन ते 75 हजार रूपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मागील दोन वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला असून येत्या दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आता या घोषणा प्रत्यक्षात पूर्ण झाल्या तर अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Share your comments