1. बातम्या

एआयटीजी कंपनीने तयार केलेले कापूस वेचणी मशिन; एका तासात वेचणार 12 किलो कापूस

सध्या शेतीपुढे सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे मजुरांची. मजूर वेळेवर न मिळाल्याने बरेचसे शेतीची कामे रखडत जातात. पर्यायाने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही समस्या प्रत्येक पिकांच्या बाबतीत आहे. कापूस पिकामध्ये तर ही समस्या तीव्रतेने जाणवते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-UACPL

courtesy-UACPL

 सध्या शेतीपुढे सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे मजुरांची. मजूर वेळेवर न मिळाल्याने बरेचसे शेतीची कामे रखडत जातात. पर्यायाने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही समस्या प्रत्येक पिकांच्या बाबतीत आहे. कापूस पिकामध्ये तर ही समस्या तीव्रतेने जाणवते.

कापूस वेचणी ही एकाच वेळी येत असल्याने मजुरांची टंचाई ही प्रकर्षाने जाणवते. या समस्येवर उपाय म्हणून गेल्या पाच वर्षापासून केलेल्या संशोधनातून हे एआयटीजी कंपनीने कापूस वेचणी चे यंत्र तयार केले आहे. या मशिनच्या साह्याने एका तासात बारा किलो याप्रमाणे आठ तासात एक क्विंटल कापूस एक जण वेचू शकतो. त्यामुळे कापूस वेचण्याची शेतकऱ्यांची समस्या यामधून दूर होण्यास मदत होणार आहे.

कपाशी क्षेत्राचा विचार केला तर मजूर टंचाईच्या समस्येने दरवर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होत आहे.एकट्या मराठवाड्याचा विचार केला तर पाच वर्षांपूर्वी कपाशी लागवडीखालील क्षेत्र हे 17 लाख हेक्‍टर होते. यावर्षी अवघ्या साडेबारा लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड आहे.यामागे प्रमुख कारण म्हणजे वाचण्यासाठी मजुरीचे वाढलेले दर आणि वेळेत वेचणीला मजूर मिळत नसल्यामुळे क्षेत्र कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

कसे काम करणार हे मशीन?

 या मशीनच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीमागे एक मोठी बॅग लावलेली आहे. तसेच दोन प्लास्टिकच्या दाते बसवण्यात आले आहेत. हे यंत्र नुसते कपाशीच्या बोंडा जवळ नेले असता एक कापूस ओढून मागे लावलेल्या पिशवी मध्ये ऑटोमॅटिक टाकते. 

हे वजनाने हलके असल्यामुळे सहजतेने हाताळता येते.त्याला एक वरच्या बाजूला बटण असून ते बटन चालू केले असता मशीन बोंडा जवळ नेले असता  कापूस आत मध्येखेचलाजातो. या मशीन चे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनच्या सहाय्याने कापूस वेचणी केले असता कापसामध्ये कुठल्याही प्रकारचा काडीकचरा अथवा घाणखेचली जात नाही. कापूस हा स्वच्छ आणि दर्जेदार येतो.(स्त्रोत- दिव्यमराठी)

English Summary: AITG company develope cotton pick machine Published on: 21 October 2021, 10:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters