जर तुम्ही अकाउंट्स किंवा फायनान्स क्षेत्राशी (Accounts or Finance) संबंधित आहात, किंवा या क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी आहे.एअर इंडिया (Air India)या सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनीत नोकरीची संधी (Air India Vacancy 2021) उपलब्ध झाली आहे. एअर इंडियामध्ये नोकरभरती केली जाते आहे.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस (Air India Airport Services) विविध पदांवर नोकरभरती (Air India Job Vacancy) करणार आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील दिल्ली (Delhi), कोलकाता (Kolkata), मुंबई (Mumbai) आणि चेन्नईसाठी (Chennai)या मेट्रो शहरांमध्ये काम करावे लागेल. एअर इंडियात होत असलेल्या नोकरभरतीतील विविध पदांची माहिती, नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म (Online Application form) पुढे देण्यात आल्या आहेत.
पदांची माहिती (Details of Post)
मॅनेजर (फायनान्स) - ०४ पदे
ऑफिसर (अकाउंट्स) - ०७ पदे
असिस्टंट (अकाउंट्स) - ०४ पदे
एकूण पदांची संख्या - १५
पे-स्केल (Basic Pay)
मॅनेजर - ५०,००० रुपये प्रति महिना
ऑफिसर - ३२,२०० रुपये प्रति महिना
असिस्टंट - २१,३०० रुपये प्रति महिना
पदांसाठीची पात्रता किंवा एलिजिबिलिटी
कोणताही पदवीधर (फायनान्स किंवा अकाउंट्सच्या वर्षाच्या अनुभवासह), एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंट एअर इंडियातील या पदांसाठी (Govt Job)अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे याची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल.
अर्ज कसा करावा
एअर इंडियातील या नोकरभरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकद्वारे डाउनलोड करा. त्याची प्रिंट काढा. हा अॅप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरून त्याची सॉफ्ट कॉपी एअर इंडियाच्या ईमेल आयडीवर म्हणजेच hrhq.aiasl@airindia.in वर पाठवा. ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडण्यास विसरू नका. अर्जासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. एअर इंडियातील या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ०१ जून २०२१ ही आहे.
तुमच्या उपयोगाच्या लिंक्स
एअर इंडियाची अधिकृत वेबसाईट - http://www.airindia.in/
अॅप्लिकेशन फॉर्मसाठीची लिंक - http://www.airindia.in/writereaddata/Portal/career/937_1_AIASL-ADVT.pdf
या पदांसाठी कशी होणार निवड
एअर इंडियातील या विविध पदांसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुम्ही केलेल्या अर्जाची चाळणी किंवा स्क्रिनिंग केली जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. या मुलाखतीच्या आधारेच योग्य उमेदवारांची निवड होणार आहे.
Share your comments