
प्रगतीशील शेतकरी यांचा सन्मान करताना मान्यवर
पुणे: 15 ऑगस्ट 2018 स्वातंत्रदिन रोजी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्था (व्हॅमनीकॉम), पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी अॅगझॉनचे बँकिंग भागीदार, उद्योग भागधारक, व्यावसायिक तसेच कृषी विद्यापीठातील तज्ञ, विविध पदाधिकारी महाराष्ट्र शासन उपस्थित होते. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी उद्योग आणि प्रगतीशील शेतकरी / उत्पादकांमधील दुवा अशी होती.

जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक मार्गदर्शन करताना
या कार्यक्रमा दरम्यान जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अन्नद्रव्याचे महत्व आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच सेंद्रिय निविष्ठा आणि उत्पादन यांचे शेतीतील महत्व आणि भविष्यातील गरज याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला १५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील १२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. के. के. त्रिपाठी, चार्टर्ड अकाऊंटंट श्री. सी. व्ही. काळे अॅगझॉन चे सह संस्थापक श्री. विशाल रतन व हेमंत कळमकर उपस्थित होते.
अॅगझॉनचे सह संस्थापक श्री. विशाल रतन बोलताना त्यांनी अॅगझॉन अॅग्रोची जैव उत्तेजके, विविध खते आणि इतर उत्पादिते व पाण्याचा सामू संतुलित ठेवून खतांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
Share your comments