कृषी संबंधित दोन विधेयके मंजूर; राज्यसभेत जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक सादर होणार आज

21 September 2020 10:43 AM By: भरत भास्कर जाधव


नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधात शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयके मंजूर करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली होती. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक २०२० ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली आहेत. आज राज्यसभेत जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकांना देशभरातल्या शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत.

या तीन विधेयकांवरुन एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळाले. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. पंजाब, महाराष्ट्रासह या विधेयकांचा अन्य काही राज्यांनी विरोध केला आहे. राज्यसभेत बोलताना काँग्रेससह विरोधी बाकांवरील पक्षांनी विधेयकांवरुन सरकारवर टीका केली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या बिलाला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे फर्मान असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. तर काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा म्हणाले की, काँग्रेस या विधेयकांना विरोध आहे. या विधेयकांना सहमती देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करण्यासारखे आहे.ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार का?, त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

The Essential Commodities (Amendment) Bill agriculture bill Rajya Sabha राज्यसभा विरोधी पक्ष Opposition party जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक शेतकरी संघटना farmers' association
English Summary: agriculture-related two bills Passed ; Today The Essential Commodities (Amendment) Bill will be introduced in the Rajya Sabha

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.