1. बातम्या

Agriculture News : राज्यातील शेतीच्या महत्त्वाच्या ५ अपडेट; जाणून घ्या एका क्लिकवर

खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे.

Agriculture news

Agriculture news

१) राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून बांबू लागवड करावी
पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरे तालुका महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. तसंच ऊस लागवडीमधून साधारणतः हेक्टरी उत्पादन 100 टन आणि भाव प्रति टन किमान 2500 मिळतो. तर बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन आणि भाव प्रति टन किमान 4000 मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

२) कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील
खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशी माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते.

३) केळीचे दर टिकून, मागणी कायम
खानदेशात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसंच या भागात केळीचे दर काही दिवसांपासून टिकून आहेत. कमी दर्जेच्या केळीला बाराशे रुपयांचा भाव मिळत आहे. तर उत्तम केळीला २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. तसंच बाजारात आवक कमी आणि मागणी असल्याने दर स्थिर आहेत. तर सध्या खानदेशात केळीची काढणी सुरु आहे. नाशिकमध्ये काल शनिवारी केळीला सरासरी ७५० रुपयांचा भाव मिळाला आहे. तर पुण्यातील मोशी येथे ४ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे.

४) २३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार
राज्यभरातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तर २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंच पदासाठी पोटनिवडणूक आज पार पडली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. उद्या ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. तरी देखील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप-राष्ट्रवादी लढत दिसून आली आहे. यामुळे आता सर्वांचं लक्ष ग्रामपंचायत निकालाकडे लागले आहे.

५) हवामानात बदल झाल्याने पावसाची शक्यता
राज्यातील वातावरणात बदल झाल्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशाारा हवामान खात्याने दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ उतार होताना दिसत आहे. तसंच राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा अनुभवायला मिळत आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे मात्र ढगाळ हवामान दिसून येत आहे. काल शनिवारी मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून आले. रत्नागिरी येथे उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

English Summary: Agriculture News 5 important updates of agriculture in the state in one click Published on: 05 November 2023, 01:03 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters