१.राज्यात तापमान घटते; थंडीचा जोर वाढणार
२.लसणाची आवक घटल्याने वाढला भाव
३.पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल
४.कापसाच्या भावात क्विंटल मागे १ हजार रुपयांची घसरण
५.आता मल्टीस्टेट सहकारी व कृषी पतसंस्थांची होणार बँक
१.राज्यात तापमान घटते; थंडीचा जोर वाढणार
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. तसंच उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात वाहत असल्याने तापमानाचा पारा घटल्याने राज्यात गारठा जाणवत आहे. राज्यातील तापमान देखील मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील तापमान १० अंशांच्या खाली असल्याने थंडीचा अद्यापही कायम आहे.उत्तर भारतातील वातावरणाचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडीवर याचा देखील परिणाम झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार आहे.
२.लसणाची आवक घटल्याने वाढला भाव
सद्या लसणाचे भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे.मुळातच उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भावात वाढ होत होती.लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव मिळत आहे... लसणाची बाजारातील आवक खपूच कमी आहे. तर मागणी मात्र चांगली दिसते. सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे.किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगेच वाढले आहेत.यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून,लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.त्यामुळे लसणाचे भाव वाढल्याने सर्वसामाण्य ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका पाहायला मिळतोय.
३.पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल
आंब्याचा सिजन आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.. आंब्याच्या हंगामात केशस, हापूस, लालबाग असे विविध आंबे बाजारात दाखल होतात. त्यामुळे प्रत्येक आंबा प्रेमी आपआपल्या परिने आवडतीचे आंबे खातात. दि.१८ रोजी पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. यामुळे आता हळूहळू बाजारात आंबे दाखल होतील, अशी आशा सर्वांना लागली आहे.पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. तर या मानाच्या पहिल्या पेटीला २१ हजार रुपये दर मिळाला असुन सर्वाधिक लिलाव बोली बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने लावून ही मानाची पेटी विकत घेतली. या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत.पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली होती.
४.कापसाच्या भावात क्विंटल मागे १ हजार रुपयांची घसरण
काही दिवसांत कापसाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. दर वाढतील,या अपेक्षेने शेतकर्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. दर वाढण्याऐवजी सतत घसरण होत असल्यामुळे शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत आहे.भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलं आहे.परंतु कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतमाल किती दिवस घरात ठेवायचा,असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षात याच महिन्यातकापसाला चांगला भाव मिळाला होता.या तुलनेत कापसाची आवक कमी असून सुद्धा कापसाच्या भावात क्विंटल मागे १ हजार रुपयांच्या सुमारास घसरण झालीय.अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या कापसाची मोठ नुकसान झाले होते . त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
५.आता मल्टीस्टेट सहकारी व कृषी पतसंस्थांची होणार बँक
केंद्र सरकारने देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्थांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यापैकी १२ हजाराहून अधिक कृषी पतसंस्थांची नोंदणी झाली आहे. सुमारे पाच वर्षात उर्वरित पतसंस्थांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे.नवीन सुधारणेनुसार केवळ कर्ज वाटपच नव्हे तर उत्पादन विक्री व्यवस्थेतही या पतसंस्थांना सहभागी होता येणार असून त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. दरम्यान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले.बँका बहुराज्य व्हाव्यात आणि अधिकाधिक बहुराज्य सहकारी संस्था आणि पतसंस्थांचे बँकांमध्ये रूपांतर व्हावे या दिशेने वाटचाल करायला हवी, असेही ते म्हणाले.
Share your comments