1. बातम्या

कृषीमंत्र्यांनी उघड केली खतांची साठेबाजी ; मंत्र्यांनी केले स्टिंग ऑपरेशन

औरंगाबादेत सध्या एका स्टिंग ऑपरेशनची खुप चर्चा होत आहे. हे स्टिंग ऑपरेशन कुठल्या गुन्हे शाखेनं किंवा कुठल्या लाचलुचपत विभागाने केलेले नाही. हे ऑपरेशन स्वत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी केले आहे. औरंगबादेत खते, बियाणे हे चढ्या भावाने विक्री होत असल्याची तक्रार कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आली होती त्याचा मागोवा घेत मंत्र्यांच चक्क शेतकरी असल्याचे भासवत साठेबाजीचा भांडाफोड केला.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


औरंगाबादेत सध्या एका स्टिंग ऑपरेशनची खुप चर्चा होत आहे. हे स्टिंग ऑपरेशन कुठल्या गुन्हे शाखेनं किंवा कुठल्या लाचलुचपत विभागाने केलेले नाही. हे ऑपरेशन स्वत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी केले आहे. औरंगबादेत खते, बियाणे हे चढ्या भावाने  विक्री होत असल्याची तक्रार कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आली होती त्याचा मागोवा घेत मंत्र्यांच चक्क शेतकरी असल्याचे भासवत साठेबाजीचा भांडाफोड केला.  हा सगळा प्रकार आहे औरंगाबादमधील जाधववाडीतील. येथे असलेल्या नवभारत फर्टिलायर्समध्ये साठेबाजी केली जात होते. याचाच भांडाफोड भुसे यांनी केला, यामुळे खतांची साठेबाजी करणाऱ्या आणि चढ्या भावाने बियाणे विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

जाधववाडीतील नवीनकुमार पाटणी यांच्या नवभारत फर्टिलायझर्ससह काही खते, बियाणे विक्रेत्यांबाबत शेतकऱ्यांनी फोनवर दादा भुसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे रविवारी बीडला जाताना जाधववाडी येथील  खतविक्री केंद्राची तपासणी केली. या दुकानात रासयनिक खते मिळत नसल्याच्या  तसेच युरिया जर पाहिजे असेल तर दुसरे खते व सोबत बियाणे विकत घ्यावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच चढ्या दराने खतांची  विक्री होत असल्याच्याही तक्रारी होत्या. त्यावरून नवभारत फर्टिलायझर्स येथे दादा भुसे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या वेशात एका शेतकऱ्यासोबत दुचाकीवर गेले. दुकानात गेल्यावर कृषीमंत्र्यांनी दहा खताच्या गोण्या विनंतीपूर्वक मागितल्या मात्र दुकानदाराने त्यांना नकार दिला. त्यांनी मंत्र्यांनी पाच गोण्या मागितल्या तेव्हा दुकानदाराने खते नसल्याचे सांगितले. मग बोर्डवर स्टॉक असल्याचे दिसत आहे, मग तुम्ही स्टॉक नाही असे का सांगत आहात. असा प्रश्न भुसे यांनी विचारला. शेतकऱ्यांच्या वेशातील भुसे यांनी मग स्टॉकचे रजिस्टर मागितले. विक्रेत्याने रजिस्टर घरी असल्याचे सांगितले. तीनशे रुपयांपेक्षा जास्त भावाने खत मिळेल, असेही  विक्रेत्याने सांगितले. त्यावरुन खत विक्रीत घोळ होत असल्याचे लक्षात येताच भुसे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना घटनास्थळी  बोलावून घेतले आणि त्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.

नवभारत फर्टिलायझर्सचे मालक पाटणी यांची सहा ते सात गोदामे तपासल्यानंतर १ हजार ३८६ गोण्या स्टॉकमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुकानदारवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.  दरम्यान स्वत कृषीमंत्र्यांना येऊन छापा टाकावा लागला. त्यामुळे जिल्हा कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी येत्याच गुण व नियंत्रक अधिकाऱ्याने दुकानाची तपासणी करणे गरजेचे होते. परंतु त्याने तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याला सक्तीच्या रजेवर पाठविले. दरम्यान मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्याचा दौरा करीत आहे. आता बीडमध्ये जात आहे. आढावा बैठक ज्या दिवशी होती, त्याच दिवशी  तक्रारीनुसार कारवाई करणार होतो. परंतु त्यादिवशी बैठक जालन्याला झाल्यामुळे काही करत नव्हते. आता ताफा लांबवर उभा करुन शेतकऱ्याच्या वेशात खताची साठेबाजी चव्हाट्यावर आणल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

English Summary: agriculture minister's sting operation in fertilizer's shop Published on: 22 June 2020, 02:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters