Agriculture News : राज्यात सर्वदूर परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे (Monsoon Return Rain) मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर शेत पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
हेही वाचा: आज 'धनत्रयोदशी', शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
यावेळी बोलतांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये.
हेही वाचा: भारतात स्वस्त लॅपटॉप JioBook लाँच; जाणून घ्या फीचर्स, किंमत
पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ; असा करा अर्ज
Share your comments