शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. अवकाळी पाऊस, बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. तसेच इतरही अनेक अडचणी येत आहेत. सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरणं तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेणं, त्यावर उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. यामुळे प्रशासन आता अनेक निर्णय घेत आहे. यासाठी आता प्रशासन शेतकऱ्यांच्या घरी जात आहे.
यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. याची सुरुवात देखील आता झाली आहे. आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्रीचा मुक्काम सत्तार यांनी साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी केला आहे.
LIC ची जबरदस्त स्कीम, 122 रुपयांची बचत करून तुम्हाला मिळणार 26 लाख, जाणून घ्या..
आजपासून स्वत: कृषिमंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून करत आहेत. धारणी चिखलदरा या अत्यंत दुर्गम , डोंगराळ, कोरडवाहू आणि आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते संपूर्ण दिवसभर असणार आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, जाणून घ्या..
राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी अनेक आहेत. त्यातून निर्माण होणारे नैराश्य आणि त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे आणि ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शरद पवार पंतप्रधान होणार? खुद्द पवार म्हणाले, पंतप्रधानपद...
आता कारखान्यावर चकरा मारणे होणार बंद! आता शेतात बसून होणार उसाची नोंदणी
'अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो, कॅनॉलचे अस्थिरीकरण 15 वर्ष सत्तेत असताना का केलं नाही?'
Share your comments