
Agriculture Minister Dhananjay Munde
Nagpur News : नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली आहे. तसंच उमरगाव , उमरेड तालुक्यातील चांपा, पाचगाव, गावसुत, तसेच कुही व मौदा तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहे. त्यामुळे कृषिमंत्री मुंडे या दौऱ्या दरम्यान नुकसानग्रस्तांसाठी काय घोषणा करतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
सध्या मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अति पावसामुळे काही शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसंच पावसाचा खंड असल्याने पिके वाळून जाऊनही नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. उद्या (दि.३) रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत येलो मोझॅक आणि पिकावर झालेल्या अळीचा प्रादुर्भाव त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्यावर शासन निर्णय घेणार आहे, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली आहे.
नागपूरमध्ये २२ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं झालं. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली होती. सध्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरूआहे. पूर स्थिती ओसरल्यानंतर कृषिमंत्री मुंडे यांनी आज (दि.२) रोजी पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि.२९) सप्टेंबर रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर मधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आता कृषिमंत्री मुंडे पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यामुळे या मंत्र्यांच्या दौऱ्यातून शेतकऱ्यांना आता तरी मदत मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Share your comments