उत्तम आणि आधुनिक प्रकारे शेती करून समाजापुढे एक उत्तम आदर्श ठेवलेल्या शेतकऱ्यांना कृषीच्या विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाच हजार शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आले आहे. या बँकेतील सर्व शेतकऱ्याची कृषिमंत्री दादाजी भुसे आज सात डिसेंबर रोजी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमांमध्ये शेतकरी बांधव कृषी विभागाच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट या यूट्यूब चैनल द्वारे सहभागी होऊ शकतात.
बऱ्याच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या एकूण 3606 शेतकरी बंधू भगिनींची रीसॉर्ट बँकेच्या यादी चे अनावरण कृषिमंत्री श्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते जुलै 2020 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथे झाले. तसेच कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी व पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा देखील समावेश यामध्ये करण्यात आला आहे. हे सगळ्या शेतकरी मिळून एकूण 5009 शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगल्या प्रकारची वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून सद्यस्थितीत काही शेतकरी अभिनव उपक्रमांच्या आणि शेतीमध्ये तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धत वापरून उत्पादन व उत्पन्न वाढ करत आहेत. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांपुढे ठेवणे, कृषी विभागाने त्यादृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे व अशा विविध प्रकारच्या अभिनव उपक्रम शेतकऱ्यांबरोबरच विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे या उद्देशाने रिसोर्स बँक तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा:पंतप्रधान-कुसुम योजना उपडेट :10 गीगा वॅट सौरऊर्जेचे प्लांट उभारण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीकडून राज्ये कर्ज घेणार
कृषी सहायकांनी त्यांचे अधिकार क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यात रेसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. या बँकेच्या माध्यमातून विविध पिकाचे तंत्रज्ञान, वाणांची निवड, विविध पिकांसाठी लागणारी खतांची मात्रा आणि कीड व रोग प्रादुर्भाव होऊन नियंत्रण या व अशा विविध गोष्टींबाबत मार्गदर्शनासाठी अशाच प्रकारचा व्हाट्सअप ग्रुप देखील तालुका स्तरावर स्थापन झाला असून याशिवाय राज्यातील सर्व जिल्ह्यातील रिसोर्स बँकेतील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे जिल्हा नुसार व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले असून या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान देवाण-घेवाण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
Share your comments