सद्या भारतातील कृषी निर्यात क्षेत्र अत्यंत वेगाने वाढतांना पाहायला मिळत आहे.सध्या देशात कृषी निर्यातीने अंदाजे ५० अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे.आता २०३० पर्यंत देशातून कृषी निर्यात दुप्पट होईल आणि ती १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा देखील ओलांडेल अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फूड अँड बेव्हरेज शो इंडस फूड २०२४ मध्ये सुनील बर्थवाल यांनी हजेरी लावली.त्यावेळी बोलतांना ते म्हणालेत.देशातून कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढत आहे.सध्या कृषी निर्यातीने ५० अब्ज डॉलर्सचा आकडा पण ओलंडला आहे.येत्या २०३० पर्यंत हा आकडा दुप्पट होईल.म्हणजेच १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.२०३० पर्यंत देशातून वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे लक्ष्य २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.असं देखील केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले.
२०३० पर्यंत निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचणार-
केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यावेळी बोलतांना म्हणालेत,आज भारताची कृषी निर्यात ५० अब्ज डॉलर चा टप्पा ओलांडला आहे..येणाऱ्या पुढील ६ वर्षात म्हणजेच ती २०३० पर्यंत दुपटीने वाढून १०० अब्ज डॉलरवर जाईल,असे ते म्हणालेत.भारतात रेडी टू फूड सेगमेंटमध्ये तयार खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात वाढीला खूप मोठा वाव आहे. खाद्य प्रक्रिया उद्योगाने आयातदार देशांच्या आवश्यक तांत्रिक मानकांची पूर्तता करण्यावर भर द्यायला हवा.उद्योगांनी गुणवत्ता,दर्जा नियंत्रण, पोषण मूल्य, सेंद्रिय घटक आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंग या घटकांना प्राधान्य दिले पाहिजे.जागतिक व्यासपीठावर अन्न पोषणाला प्रोत्साहन आणि चिरंतनतेला चालना देणे तितकेच महत्त्वाचे आहे,भारतीय उत्पादने आणि सेवा हव्या असलेल्या देशांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्यांनी काम करावे.असेही ते म्हणाले
चालू आर्थिक वर्षात कृषी निर्यात वाढ होणार
भारतातील कृषी निर्यात क्षेत्र अत्यंत वेगाने वाढतांना पाहायला मिळत आहे .सध्या देशाने कृषी निर्यातीने अंदाजे ५० अब्ज डॉलर्सचा आकडा ओलांडला आहे.आता २०३० पर्यंत देशातून कृषी निर्यात दुप्पट होईल आणि ती १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.सध्या कृषी निर्यातीने ५० अब्ज डॉलर्सचा आकडा पण ओलंडला आहे.काही अधिकाऱ्यांनी असा अंदाज वर्तवला होता की सद्या केंद्र सरकारने तांदूळ,गहू,साखरेसह अनेक आवश्यक खाद्यवस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणले,त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कृषी निर्यातीला फटका बसेल.परंतु याबातीत सुनील बर्थवाल म्हणाले तांदूळ,गहू,साखरेसह खाद्यवस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले असले तरी चालू आर्थिक वर्षात एकूण कृषी निर्यात वाढलेली दिसेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Share your comments