बारामतीमधील गतवर्षीचे कृषी प्रदर्शन आजपासून सुरू होणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन हे एक पर्वणीच असते.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या ( Agricultural Development Trust, Baramati ) कृषी विज्ञान केंद्र, (KVK) अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2023 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे.
19 ते 22 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन खुले राहणार आहे. 3 ते 18 जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्होव्हेटर यांच्याकरिता वेबिनारचे आयोजन केरण्यात आले होते. प्रदर्शनमध्ये प्रत्येक प्लॉटवरती त्या पिकाचे माहितीचे बोर्ड तसेच त्या ठिकाणी माहिती देणारी व्यक्ती असणार आहेत.
ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण
येथे असलेली 153 जातीच्या भाजीपाल्याची 52 पिके, शेतातील 54 नाविन्यपूर्ण स्टार्टअप, फुल शेतीची 27 पिकांचे 112 वान, स्मार्ट मशीनरीचे 108 प्रकार, १४ प्रकारचे खतांचे डेमो दाखवले जाणार आहेत.
तसेच व्हर्टीकल फार्मिंग, एन एफ टी तंत्रज्ञान, आय ओ टी रोबोट सेंसर आधारित स्मार्ट सिंचन, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञाची ४५ प्रात्यक्षिके, जवस बकव्हींट, हळवी तसेच रब्बी हायब्रीड कांदा, करडईच्या नवीन पिक पद्धती, सफरचंद, एव्हाकोडा, बारमाही फणस आदी ४७ जातींचे व 33 फळ पिकांची रोपे निर्मिती व विक्री, कोरडवाहू जमिनीसाठी अफलातून आंतरपीक पद्धती, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्त भरड धान्याची उत्पादन प्रक्रिया प्रात्यक्षिके इत्यादी अनेक गोष्टी सह २१० कंपन्यांचे स्टॉलस त्या ठिकाणी पाहता येणार आहेत.
भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी थांबवायची असेल तर पुरवठा प्रक्रिया साखळी करा सक्षम
कृषी प्रदर्शनाला आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हजेरी लावणार आहेत. 23 जानेवारीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) या प्रदर्शनास भेट देणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
मातीची जैविक क्षमता टिकवणे आज महत्त्वाचे
शिंदे सरकारने शब्द पाळला! नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय
ऊस उत्पादकांची वास्तवता, शेतकऱ्यांनो हा लेख तुमच्यासाठी..
Share your comments