विदर्भ मधले म्हणजे संत्रा फळ पिकाचे आगार म्हणून संबोधण्यात येते. विदर्भामध्ये जवळजवळ एक लाख पंचवीस हजार एकर क्षेत्रावर संत्र्याची लागवड होते.एकट्या नागपूर जिल्ह्यात 25 हजार हेक्टर क्षेत्र हे संत्रा लागवडीखाली आहे.
परंतु मागील काही वर्षांपासून संत्राफळ गळती हीसंत्रा बागायतदारांना पुढील प्रमुख समस्या होऊन बसली आहे. वातावरणात होणारे अचानक बदल व त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे संत्रा फळगळ हीहोत असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर या समस्येने त्रस्त झाले आहेत. ही समस्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तर उद्भवते. परंतु यावर सर्व प्रकारच्या उपाययोजना या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याआधीच्याआहेत.बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संत्रा फळगळ वर नियंत्रण मिळवण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कोणत्याही प्रकारची शिफारस नाही.
ही प्रमुख समस्या यामागे आहे. राज्याची संत्रा उत्पादकताही पाच लाख टनअसताना ह्या हंगामात फळगळतीअर्ध्याने कमी होत अडीच लाख टनांपर्यंत आली होती.
कृषी विभागाचा प्लान
यासाठी या समस्येवर उपाययोजनांसाठी कृषी विभागाने एका टास्क फोर्सचे गठन केले आहे. या मधील कर्मचाऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये यामध्ये गावांमधील पाच शेतकरी असतील व त्यांच्याकडून शिफारशीत उपाययोजनांची अंमलबजावणी करून घेतली जाईल.
म्हणजे इतर शेतकऱ्यांनी शिफारशीत उपाययोजना न केल्यास निश्चितच प्रादुर्भाव वाढीस लागेल. त्यामुळे या पाच शेतकऱ्यांनी केलेले उपाय योजनाचेहेमॉडेल इतर शेतकऱ्यांना दाखवणे शक्य होईल अशी कल्पना यामागे आहे. यामध्ये प्रत्येक हंगामाच्या अगोदर पाच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निवडून त्यांना या उपाययोजना सांगितल्या जातील व त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून घेण्याचे काम हे कृषी पर्यवेक्षक करतील. व या पाच शेतकऱ्यांचे अनुकरण इतर संत्रा उत्पादक शेतकरी देखील करतील असेयामध्ये अपेक्षित आहे.
Share your comments