1. बातम्या

हरभरा बियाण्यावर कृषी विभागाकडून मिळणार प्रतिक्विंटल 2500 रुपये अनुदान, कृषी विभागाची मोहीम

राज्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाने 38 कोटी रुपयांची अनुदानित बियाणे वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gram crop

gram crop

 राज्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाने 38 कोटी रुपयांची अनुदानित बियाणे वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे.

 यामध्ये एका शेतकऱ्याला पाच एकर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यावर प्रतिक्विंटल दोन हजार 500 रुपये अनुदान दिले जात आहे. रब्बी हंगामातील बियाणे वाटपाच्या नियोजनाचा आढावा कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतला. कृषी विभागाकडून वाटल्या जाणाऱ्या हरभरा बियाणे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,यामुळे हरभऱ्याचे उत्पादन व उत्पादकतावाढण्यास मदत होईल असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेची सुरुवात राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून सोमवारपासून राज्यभर सुरू झाली व ही मोहीम 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या वेळेस भरपूर पाऊस झाल्यामुळे हरभरा पिकासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत असल्यामुळे हरभरा पिकासाठी चांगली स्थिती आहे त्यामुळे यावर्षी हरभरा लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

 यावर्षी रब्बी हंगामात 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात दर्जेदार हरभऱ्याचे बियाणे मिळवून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. 

या मोहिमेअंतर्गत किमान एक लाख 97 हजार क्विंटल बियाण्याची वितरण केले जाईल. यापैकी शेतकऱ्यांना ते 20 हजार क्विंटल बियाणे पूर्णपणे मोफत दिले जात आहे. या मोहिमेअंतर्गत हरभऱ्याचे फुले विक्रांत, फुले विक्रम,आरव्हीजी 202,बीडीएनजीके 798 या वानांचा समावेश करण्यात आला आहे.( संदर्भ- ॲग्रोवन )

English Summary: agriculture department give 2500 subsidy on gram seeds Published on: 20 October 2021, 09:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters