1. बातम्या

कृषी क्षेत्र झालं डिजिटल; ई-नामच्या साहाय्याने हळदीचा लिलाव

यांत्रिककरणाबरोबर शेती व्यवसाय हा डिजिटल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, कामे लवकर पुर्ण व्हावीत यासाठी सरकारकडून विविध सुविधा ऑनलाईन दिल्या जात आहेत. अशीच एक सुविधा ज्यातून शेतकऱ्यांच्या दाराशी बाजारपेठा आल्या आहेत.

KJ Staff
KJ Staff


यांत्रिककरणाबरोबर शेती व्यवसाय हा डिजिटल होताना दिसत आहे.  शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, कामे लवकर पुर्ण व्हावीत यासाठी सरकारकडून विविध सुविधा ऑनलाईन दिल्या जात आहेत. अशीच एक सुविधा ज्यातून शेतकऱ्यांच्या दाराशी बाजारपेठा आल्या आहेत.  ही सुविधा म्हणजे भारत सरकारची  ई-नाम पोर्टल नॅशनल अॅग्रीकल्चर  मार्केट योजना (National Agricultural Market ).  याचाच फायदा सांगलीमधील बाजार समितीला आणि हळद उत्पादकांना आता  होत आहे.

कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणची बाजारपेठ  बंद पडल्या होत्या.  बाजार समित्यांमध्ये गर्दी होत असल्याने बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला  होता. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ई-नाम(e-NAM) पोर्टल हे फायदेशीर ठरत आहे.  कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या सांगलीतील सौदा लिलाव ई-नाममुळे सुरू झाला आहे.  सांगलीची बाजारपेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे. सांगलीच्या बाजार समितीमध्ये  इतर जिल्ह्यांसह आणि देशातील इतर हळद उत्पादक राज्य  आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील शेतकऱ्यांचाही माल आडत्यांकडे विक्रीसाठी येत असतो.  परंतु कोरोनामुळे येथील लिलाव बंद होता. पण शासरनाच्या ई-नाम(e-NAM) पोर्टलने व्यापाऱ्यासह शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली आहे. 

कोरोनामुळे सांगली बाजार समितीने हळदीचे लिलाव प्रथमच ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहेत.  २७ एप्रिलपासून ई-नाम पोर्टलवर हळद लिलावाची पद्धत सुरू करण्यात आली आहे.  लिलाव सुरु होऊन दोन दिवस झाले असून आतापर्यंत साडे पंधरा हजार पोत्याची खरेदी झाली आहे. आतापर्यंत ५५७ शेतकऱ्यांनी ई- लिलाव मार्फत मालाची विक्री केल्याची  माहिती सांगली बाजार समितीमधील( ई-नाम )  ईलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी मार्केटचे प्रमुख विनायक साहेबराव घाटगे यांनी दिली.

 


दरम्यान हळद सौद्याला  दहा दिवसांपूर्वी प्रारंभ होणार होता परंतु गर्दीचा धोका लक्षात घेऊन सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  सांगली बाजार समितीला गेल्या तीन वर्षांपासून ई-नाम पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.  परंतु याआधी बाजार समितीत फक्त बेदाणाची ई-बिडीग केले जात होती.  हळदीचे प्रमाण अधिक असल्याने हळदीचा लिलाव केला जात नव्हता, पंरतु गेल्या २७ एप्रिलपासून हळदीचा लिलाव करण्यात येत असल्याचे विनायक घाटगे यांनी सांगितले.

 असा होतो लिलाव -

बाजार समित्यांमधील आडत्यांना समिती एक, दोन , तीन असे  नंबर देत असते. या आडत्यांकडे इतर राज्यातील हळद उत्पादकही आपला माल घेऊन येत असतात.  या नंबर अनुसार बाजार समिती दररोज ५ ते ७ आडत्यांच्या दुकानात आलेली आवकची माहिती घेतली जाते. आडत्यांकडे ५ ते १५ हजार पोत्यांची आवक झाली असेल तर त्यांची सौदे पावती , फार्म भरला जातो. आडत्यांकडे शेतकऱ्यांच्या नावासह उत्पादकांची सर्व  माहिती असते.  शेतकऱ्यांचे नाव, आवक, माल कुठला आहे, किती माल आहे, याची माहिती घेऊन  सौदा फार्ममध्ये भरली जाते. त्यानंतर ही माहिती  ई-नाम पोर्टलवर फिडींग केली जाते. त्यानंतर एक स्लीप जनरेट होत असते. या स्लीपवर आडत्याचे नाव, दुकानाचे नाव, शेतकऱ्याचे नाव, आणि आवक नंबर असतो. ही स्लीप जनरेट  झाल्यानंतर ती स्लीप आडत्याला दिली जाते.  मग ही स्लीप हळदीच्या पोत्यांवर लावली जाते. 

साधरण २० पोत्यांसाठी एक स्लीप दिली जाते. त्या हळदीची गुणवत्ता पाहून खरेदी करणारे बोली लावत असतात.  बोली लावण्यासाठी साधरण तीन तास दिले जातात.  जर पोती जास्त असलेले तर अधिक वेळ दिला जातो.  तीन तासांनंतर जी जास्त  बोली लावली जाते त्याला विजयी केले जाते.  त्यानंतर टेंडर ओपन केले जाते.  ज्या -ज्या खरेदी करणाऱ्यांना माल  सुटला आहे, त्याची माहिती त्यांना पोर्टेलवर दिसत असते. व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार संबंधित दुकानात जाऊन हळद पाहणी केली जाते.   शेतकऱ्यांना माल विक्रीचा पैसा हा आडत्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने दिला जातो.  दरम्यान महाराष्ट्रामध्ये  हळदी या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.
 

English Summary: agriculture become digital ; termeric auction through e-NAM Published on: 01 May 2020, 05:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters