
ऍग्रीव्हिजन विदर्भ प्रांत व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अकोला तर्फे मा.कुलगुरू डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील महामारी सदृष्य आणि ताळेबंदाची परिस्थितिने आर्थिक फटके बसले असताना ऑनलाईन होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याच्या पदवीदानासाठी च शुल्क जास्त आहे. प्रत्यक्षात कार्यक्रम होत नसताना 1000 रु शुल्कासाठी विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
इतर राज्यातील कृषि विद्यापीठ पदवी साठी 300 रु पर्यंत शुल्क आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठात याचे शुल्क सर्वाधिक आहे. यावर कायम स्वरूपी वाजवी शुल्क ठरवून योग्य तो निर्णय घेण्यात यावा त्याच बरोबर या वर्षीच्या कार्यक्रमास कमीत कमी निधी लागणार आहे त्यामुळे आणखी आर्थिक बोजा त्यांच्यावर येऊ नये म्हणून विद्यापीठात प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा ऍग्रीव्हिजन विदर्भ प्रांत व अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेला घ्यावा लागेल असा इशारा विद्यापीठ प्रशासन विरुद्ध करण्यात आला.
निवेदन देताना विदर्भ प्रांत सह संयोजक अनिकेत पजई, कार्यालय व कोष प्रमुख देवाशिष गोतरकर, शुभम मुरकुटे, शंतनु टाले, मनोज साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Share your comments